शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

बँक खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांची ठाण्यात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 22:07 IST

खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध बँक आॅफ महाराष्टÑच्या अखिल भारतीय कर्मचारी संघटनेने ठाण्यासह देशभरात ७० ठिकाणी विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने केली. तसेच ‘देशातील राष्टÑीयकृत बँकांच्या विकासासाठी आणि रक्षणासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करु,’ अशा आशयाची यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी शपथही घेतली.

ठळक मुद्दे बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी घेतली चांगली सेवा देण्याची शपथदेशभरात ७० ठिकाणी विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध बँक ऑफ महाराष्ट्रच्या अखिल भारतीय कर्मचारी संघटनेने ठाण्यासह देशभरात ७० ठिकाणी विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने केली. तसेच ग्राहकांना चांगली सेवा देण्याची एकत्रितपणे रविवारी शपथही घेतली.बँक ऑफ महाराष्ट्र या महाबँकेचा सध्या ८६ वा स्पापना दिवस देशभर १३ ते २० सप्टेंबर या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीयकरण संवर्धन सप्ताह म्हणूनही साजरा होत आहे. खासगीकरणामुळे बँकांची लोककल्याणकारी भूमीका दूर सारली जाणार आहे. सध्याचे सरकार हे आत्मनिर्भरतेचा नारा देत या महाबँकेचे सार्वजनिक क्षेत्र हे चारित्र्य दूर सारत मालकी खासगी लोकांना विकण्याचा घाट घालत आहे. याचाच ठाण्यातील वागळे इस्टेट येथील बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठाणे, पनवेल आणि नवी मुंबईतील बँक कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी निषेध नोंदविला. बँकेला ५१ वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे. बँकेची चांगली कामगिरी आहे. मग हा खासगीकरणाचा घाट कशासाठी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी बँक राष्ट्रीयकृत असल्यामुळे कशाप्रकारे सामान्य नागरिकांना चांगली सेवा देऊ शकते, त्याचे महत्व काय? याबाबतची माहिती बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, मुंबईचे संघटन सचिव अरविंद मोरे यांनी कर्मचा-यांना दिली. यावेळी संघटनेचे महासचिव नागेश नाचणकर आणि अध्यक्ष आर. एन. पाटील यांच्यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.* यावेळी बँक कर्मचा-यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातूनही ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला. तसेच ‘देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या विकासासाठी आणि रक्षणासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करु,’ अशा आशयाची यावेळी या सर्व कर्मचा-यांनी शपथही घेतली.

टॅग्स :thaneठाणेBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रbankबँक