शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना हवी महिनाभरापेक्षा जास्त सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:41 IST

परतल्यावरही १४ दिवस क्वारंटाइन सक्तीचे होणार; ठाण्यातील कोकणवासीयांना चिंता

ठाणे : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आधीच गावी १० दिवसांचे क्वारंटाइन सक्तीचे असताना, मुंबई महापालिकेने चाकरमान्यांना परतल्यावरही पुन्हा १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. त्याच धर्तीवर आता ठाणेकरांनाही परत आल्यावर १४ दिवस होम क्वारंटाइन सक्तीचे होते की काय, अशी चिंता सतावत आहे. ठाणे महानगरपालिकेनेही तसाच निर्णय घेतल्यास चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी १0 दिवस, गावी क्वारंटाइन होण्यासाठी १० दिवस आणि परतल्यावर पुन्हा क्वारंटाइन होण्यासाठी १४ दिवस अशा तब्बल ३४ दिवसांच्या सुटीचे नियोजन करावे लागणार आहे.चाकरमान्यांना कोकणात गणेशोत्सवाकरिता जाण्यासाठी एसटी बसेसची सोय केल्यावर मोठ्या संख्येने चाकरमानी आरक्षण करून कोकणात पोहोचत आहे. गणेशोत्सव करून हा चाकरमानी पुन्हा मुंबईतही परतेल. परंतु, परराज्य किंवा परजिल्ह्यांतून मुंबईत येणाऱ्यांना क्वारंटाइन सक्तीचे केले, तरच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणणे शक्य होऊ शकते. त्यामुळे कोकणात जाणाºया ठाणेकरांनाही क्वारंटाइनची सक्ती करणाºया ठाणे महानगरपालिकेने गणेशोत्सव आटोपून आल्यावर आणखी १४ दिवस घरीच बसवले तर काय होणार, या विचाराने ठाणेकर चिंताग्रस्त झाले आहेत. अनलॉकमध्ये काही उद्योग, कार्यालये सुरू झाली आहेत. आधीच नोकºयांची शाश्वती नसताना गणेशोत्सवाहून परतल्यावर पुन्हा १४ दिवसांची सुटी मिळणे शक्य नाही. गणेशोत्सवापेक्षा क्वारंटाइनचेच दिवस जास्त होत असल्याने चाकरमानी टेन्शनमध्ये आहेत.कोकणात जाणाºयांसाठी सरकारने १0 दिवसांचे होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. मात्र, कोकणातील अनेक ग्रामपंचायतींनी क्वारंटाइनसाठी १४ दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यामुळे गावी १४ दिवस क्वारंटाइन, गणेशोत्सवाचे पाच किंवा १0 दिवस आणि पुन्हा इथे येऊन १४ दिवस क्वारंटाइन व्हायचे म्हणजे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा महिनाभरापेक्षाही जास्त कालावधी लागणार आहे.- दीपेंद्र नाईक, ठाणेकोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी क्वारंटाइनची सक्ती करणे समजण्यासारखे आहे. पण, मग सगळ्यांना सारखा नियम असला पाहिजे. मुंबई सोडून पळालेले अनेक जण पुन्हा कामाच्या शोधात मुंबईत परतू लागले आहेत. ते सक्तीने क्वारंटाइन होतात की नाही, हे पाहण्याची तसदी कुणीही घेत नाही. मग, गणेशोत्सवासाठी जाणाºयांनाही सक्ती नसावी.- रोहिणी चेंदवणकर, ठाणेक्वारंटाइनचा नियम सर्वांच्याच भल्यासाठी आहे. बाहेरगावहून आलेल्या व्यक्तीने १४ दिवस होम क्वारंटाइन झालेच पाहिजे, असे निर्देश सरकारने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार, ठाणेकरांनीही गणेशोत्सवाहून परतल्यावर स्वत:हूनच १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे. त्यासाठी आणखी वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही.- संदीप माळवी, उपायुक्त,ठाणे महानगरपालिका