शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन कक्षातील कर्मचारीच आपत्तीत, कक्षात ड्रेनेजचे पाणी; आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:38 IST

शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाने ड्रेनेज तुडुंब भरल्याने ही समस्या उद्भवल्याचे सांगितले जात असले, तरी सोमवारीही समस्या कायम होती.

डोंबिवली : दुर्घटना घडल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता यावे, यासाठी पावसाळ्यात केडीएमसी दरवर्षी आपत्कालीन कक्षाची निर्मिती करते. मात्र, आपत्तीच्या वेळी धावून जाणारे कर्मचारीच सध्या आपत्तीत असल्याचे चित्र महापालिकेच्या येथील डोंबिवली विभागीय कार्यालयात पाहायला मिळत आहे. ड्रेनेजचे सांडपाणी कक्षात घुसल्याने तेथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाने ड्रेनेज तुडुंब भरल्याने ही समस्या उद्भवल्याचे सांगितले जात असले, तरी सोमवारीही समस्या कायम होती. ग्रंथालयाच्या जागेत आपत्कालीन कक्ष स्थलांतर करूनही त्रास कायम राहिल्याने ‘आगीतून फुफाट्यात’ अशी या कर्मचाऱ्यांची अवस्था झाली आहे. ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीनुसार प्रतिवर्षी आयुक्तांकडून सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. एखादी दुर्घटना अथवा आपत्ती घडली तर त्याला सामोरे जाण्यासाठी सर्व प्रभागांतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्ष २४ तास चालू ठेवले जातात. साधारण १५ मे ते १५ आॅक्टोबर या कालावधीत हे कक्ष सुरू असतात.प्रामुख्याने पावसाळ्यात सुरू राहणारे हे आपत्कालीन कक्षच सध्या आपत्तीत सापडले आहेत. प्रामुख्याने सफाई कामगारांवर आपत्ती निवारण करण्याची भिस्त असल्याचे डोंबिवलीतील ‘ग’ आणि ‘फ’ कार्यालयातील चित्र पाहता स्पष्ट होते. याठिकाणी दिले गेलेले कर्मचारी विविध आजारांनी आणि व्याधींनी त्रस्त असल्याने त्यांच्याकडून आपत्ती निवारण्याची काय अपेक्षा करणार, असाही सवाल उपस्थित होत आहे. नियुक्त केलेल्या कर्मचाºयांंपैकी मोजकेच कर्मचारी घटनास्थळी आढळून येतात. दोन्ही प्रभागांच्या आपत्कालीन कक्षासाठी याआधी डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात जागा देण्यात आली होती. ती जागा गैरसोयीची असल्याने हा कक्ष डोंबिवली विभागीय कार्यालयातील ग्रंथालयाच्या जुन्या जागेत स्थलांतरित करण्यात आला. मात्र, तिथेही त्रास कमी झालेला नाही.कचरा अन् धुळीचे साम्राज्य!ग्रंथालयाची जुनी जागा ही अडगळीच्या सामानाचे हक्काचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे कर्मचाºयांना येथे घाण आणि कचरा, धुळीचे साम्राज्य असल्याने प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव तर आहेच; शिवाय कक्षात ड्रेनेजचे पाणी शिरल्याने बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यातआले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली