शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

आंदोलन की चमकोगिरी : कळवा रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 मिनिटांसाठी रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 10:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेला प्रशासन जबाबदार आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. हा रेल रोको पाहून राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं की चमकोगिरी?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. कळवा रेल्वे स्थानकावरुन सीएसटीला जाणारी 9 वाजून 9 मिनिटांची लोकल 2 मिनिटांसाठी अडवण्यात आली. जसे जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसहीत रेल रोको करण्यासाठी रुळांवर उतरले तसं तातडीने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मागे हटवले व लोकलचा मार्ग मोकळा केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

 

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेची पुनरावृत्ती भविष्यात घडू नये आणि बुलेट ट्रेनऐवजी लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्यक्रम द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता रेल्वे रोखून आंदोलन केलं. कळवा रेल्वे स्थानकात हे रेल रोको आंदोलन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. 

शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला तर 39 जण जखमी झालेत. त्यानंतर आता एकूणच रेल्वेच्या पादचारी पुलांच्या समस्यांकडे सर्वाच्याच नजरा वळल्या आहेत. बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविण्याऐवजी आणि ज्या ट्रेनचा मुंबईकरांना फायदाच नाही, अशी ट्रेन बंद करण्याची मागणी आव्हाडांनी केली आहे. याशिवाय सर्वसामान्यांच्या लोकलच्या संख्येत वाढ करावी, वेळेची नियमितता पाळावी, सध्या ठाणे स्थानकातून तब्बल साडे सहा लाख प्रवासी रेल्वे रोज प्रवास करत आहेत. परंतु येथील पादचारी पुलासह, इतर ठिकाणच्या रेल्वेच्या पादचारी पुलांची अवस्थाही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यामुळे या पुलांची संख्या वाढवावी, अरुंद पुल रुंद करावेत, सबर्बनसाठी 45 हजार कोटींचा निधी द्यावा, दिव्याला जंक्शनचा दर्जा द्यावा, कळव्यातून लोकल सुटाव्यात, पारसिक जंक्शन करावे, प्लॅटफॉर्म वाढवावेत आदींसह इतर मागण्यांसाठी हा रेल रोको करण्यात आला.  

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्ये रेल्वे