शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

अकरावी आॅनलाइनचा घोळ

By admin | Updated: June 18, 2017 02:18 IST

दहावीचा निकाल घोषीत होताच ११ वीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली आहे. सुमारे पाच दिवस दिवस उलटलेले असतानाही या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ शिक्षण विभागास

- सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दहावीचा निकाल घोषीत होताच ११ वीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली आहे. सुमारे पाच दिवस दिवस उलटलेले असतानाही या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ शिक्षण विभागास संपवता आला नाही. या प्रक्रियेतील फार्म क्र. २ ची आॅनलाईन माहिती सबमिट करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसांपासून शाळेत बोलवण्यात येत आहे. परंतु,तांत्रिक समस्येमुळे वेबसाईट ओपन होत नसल्याने प्रवेश अर्ज सबमिट करता आले नाहीत. काही शाळांनी सोमवारऐवजी मंगळवारी पालकांना अर्ज दाखल करण्यासाठी बोलावलेले आहे. या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून पालकवर्गांत संताप व्यक्त होत आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना ११ वीला आॅनलाईन प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २६१ महाविद्यालये सज्ज झाली आहेत. त्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या जिल्ह्यात ९५ हजार ३६० जागी या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परंतु, तांत्रिक समस्येमुळ वेबसाईट बंद आहे. यामुळे गुणवत्तेनुसार आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात कोठेही सुरू झालेली नाही. रविवार व सोमवार वगळता शाळांनी पालकांना मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी यायला सांगितले आहे. परंतु, ठिकठिकाणच्या शाळांमधील अल्पसंख्यांक कोट्यासह व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहे. गुणवत्तेनुसार एकही आॅनलाईन प्रवेश सुमारे पाच दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात झालेला नसल्याचे आढळून आले आहे. आॅनलाईन फार्म भरतेवेळी विद्यार्थ्यांकडून चुका होत असल्यामुळे यंदा प्रत्येक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत आहे. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे वेबसाईट सुरू नसल्यामुळे प्रवेश अर्ज सबमिट करता येत नाहीत. या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्यांक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश वगळण्यात आले आहेत. यामुळे उल्हासनगर, भिवंडी आदींसह जिल्ह्यातील ठिकाणचे अल्पसंख्यांक कॉलेजेस त्यांच्या ५० टक्के आरक्षणाच्या जागांसाठी आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीस्कारत आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातील ५ टक्के आरक्षित जागांसाठीदेखील प्रवेश अर्ज ठिकठिकाणी स्वीकारले जात आहेत. यासाठी बहुतांशी ठिकाणी विद्यार्थ्यांकडून कमीतकमी १०० रूपये शुल्क घेतले जात आहे. - गुणवत्तेच्या आॅनलाईन प्रवेशासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीदेखील वेबसाईटवर फार्म क्र. २ अपलोड झाला नाही. दुपारपर्यंत प्रयत्न करूनही वेबसाईट सुरळीत झाली नाही. यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर संबंधीत शाळांनी विद्यार्थी व पालकांना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतरही वेबसाईट सुरू न झाल्यामुळे शाळांना आजही आॅनलाईन प्रवेश अर्ज सबमिट करता आले नाहीत. निकाल घोषीत होऊन पाच दिवस उलटलेले असतानाही जिल्ह्यातील एक लाख तीन हजार ६०३ विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अद्यापही यशस्वीपणे पूर्ण करता आलेली नाही.