शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरी बेतली निर्दोष तरुणाच्या जीवावर; ठाण्यात विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 06:43 IST

शिवाजीनगर भागात ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पथदिव्यातून एका केबलच्या आधारे वीजचोरी केली जात होती.

ठाणे : शिवाजीनगर भागात ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पथदिव्यातून एका केबलच्या आधारे वीजचोरी केली जात होती. याच केबलमधील विजेचा धक्का निर्दोष मंदार गौरी (१७) या मुलाला बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वीजचोरी करणारे आणि महापालिकेच्या बेपर्वाईने मुलाचा बळी गेल्याचे बाेलले जात आहे.

केबलमधील विजेचा धक्का मंदारला बसला आणि तो जखमी झाला. स्थानिक रहिवाशांनी त्याला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. कळव्यातील न्यू शिवाजीनगर येथे दरवर्षीप्रमाणेच तलाव तुडुंब भरलेला होता. गुरुवारी दिवसभर संततधार पावसामुळे तलावाचे पाणी रस्त्यावर येऊन गुडघाभर पाणी साचले होते. तलावाच्या बाजूने मंदार जात असताना ठाणे महापालिकेच्या पथदिव्याच्या खांबाच्या केबलचा शॉक लागला. पाण्यात पडलेला मंदार हा आपल्याच भागातील असल्याचे समजल्यावर या भागातील वीजप्रवाह खंडित करण्यात आला. त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

वेळेत दुरुस्ती झाली असती तर...

पावसाळ्यापूर्वी खांबाच्या दिव्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते; परंतु, निष्काळजीपणामुळे निर्दोष मुलाचा जीव गेला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशीच घटना सात ते आठ वर्षांपूर्वी जानकीनगर परिसरामध्ये स्ट्रीट लाइटचा डीपी उघडा राहिल्यामुळे घडली होती. दोनच दिवसांपूर्वी स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर स्ट्रीट लाइट डीपीचे झाकण उघडे असल्याचे एका नागरिकाने लक्षात आणून दिले होते.

टॅग्स :electricityवीज