शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

मुंब्य्रात ग्राहकाला साडेआठ लाखांचे वीजबिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 00:47 IST

महावितरणचा झटका; ४८ हजार युनिटची नोंद

- कुमार बडदे मुंब्रा : घरात दोन ट्युब, फ्रीज, टीव्ही आणि पंखा ही उपकरणे असलेल्या मुंब्य्रातील विजया चव्हाण या ग्राहकाला महावितरणने फेब्रुवारीमध्ये आठ लाख ५५ हजार ५५० रुपयांचे वीजबिल पाठवून जोराचा झटका दिला आहे. या महिन्यामध्ये ४८ हजार ७९७ युनिट वापरण्याची नोंद असलेले वीजबिल पाहून या ग्राहकाचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे.मुंब्रा बाजारपेठेतील अरिहंत अपार्टमेंट या इमारतीत चव्हाण या तिसऱ्या मजल्यावर राहतात. अनेक वर्षांपासून त्या महिन्याच्या महिन्याला वीजबिल भरत आहेत. नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यानच्या तीन महिन्यांत त्यांना सरासरी ७९ युनिट वापरल्याचे देयक येत होते. मात्र, फेब्रुवारीमध्ये ४८ हजार ७९७ युनिट वापर करून भरमसाट वीजबिल पाठवले आहे. साडेआठ लाखांचे देयक पाहून चव्हाण या सैरभैर झाल्या असून मानसिक तणावात आहेत. याबाबत नेमकी दाद कोणाकडे मागायची, तक्र ार कुणाकडे करायची, याबाबत असा प्रश्न त्यांना पडल्याने त्यांची कैफियत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने महावितरणचे कार्यकारी अभियंता (शीळ विभाग) पांडुरंग हुंडेकरी यांच्याकडे मांडली. त्यांनी संबंधित वीजग्राहकाला मेक औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी सोमवारी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण