शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, कोकण पदवीधर मतदारसंघ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 03:05 IST

कोकण पदवीधर मतदारसंघाचे पडघम आता जोरदार वाजू लागले असून राष्टÑवादी आणि भाजपामधून इच्छुकांत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरूझाली आहे.

- अजित मांडकेठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाचे पडघम आता जोरदार वाजू लागले असून राष्टÑवादी आणि भाजपामधून इच्छुकांत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरूझाली आहे. परंतु, भाजपा आणि शिवसेनेने काडीमोड घेतल्याने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हे दोन पक्ष वेगळी चूल मांडणार असल्याचे चित्र जवळजवळ निश्चित मानले जात आहे. त्यानुसार, आता मतदार गोळा करण्यासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपामधून अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे.मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी भाजपाच्या संजय केळकर यांचा पराभव केला होता. परंतु, आता संजय केळकर हे सध्या ठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार असल्याने त्यांनी यातून माघार घेतली आहे. परंतु, त्यांच्या पक्षातून अनेकांनी आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यामध्ये शहराध्यक्ष संदीप लेले यांनी यासाठी जोरदार तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच मिलिंद पाटणकर, डॉ. राजेश मढवी, विनय नातू आदींचीदेखील नावे चर्चेत आहेत. परंतु, कपिल पाटील यांच्या मुलाचे नाव मात्र जोरात चर्चेत आहे. तसेच निलेश चव्हाण हे आता भाजपात असल्याने त्यांनीदेखील यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.दुसरीकडे शिवसेना प्रथमच ही निवडणूक लढणार असल्याने त्यांनी मतदारांच्या नोंदणीस सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून शिवसेनेचे माजी महापौर संजय मोरे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तसेच वरुण देसाई आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. कदाचित, कोकणातील आणखी एखादा चेहरा देण्याची तयारीदेखील शिवसेनेकडून सुरू आहे.जुलै महिन्यात निवडणुकीची चिन्हेयेत्या जुलै महिन्यात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. यात शहरी भागातील मतदारांची संख्या वाढते आहे.यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मतदार आपले मतदान करणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदारनोंदणीत सुमारे ४८ हजार मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती आहे. दुसºया टप्प्यात मतदारांची नोंदणी २१ डिसेंबरला पूर्ण होईल.

टॅग्स :Electionनिवडणूक