शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रगती महाविद्यालयात रंगली निवडणूकीची कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:03 IST

डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयामध्ये निवडणूकीची कार्यशाळा भरवण्यात आली होती.

डोंबिवली - येथील प्रगती महाविद्यालयामध्ये निवडणूकीची कार्यशाळा भरवण्यात आली होती. कल्याण डोंबिवली महापालिका, तहसीलदार आणि कॉलेज प्रशासन यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा बुधवारी संपन्न झाली. त्या उपक्रमाला शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या ज्योती पोहणे यांनी सांगितले की मतदानाचा टक्का वाढावा, त्यामध्ये युवकांचा समावेश वाढावा यासाठी जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नायब तहसीलदार गंगाराम भोईर, महापालिकेचे ग प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शहरातील हमरस्त्यांवरुन जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यातून मतदान करणे, मतदानाचा टक्का वाढवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांमध्ये जावे, त्या आधी मतदार नाव नोंदणी करण्यासाठीही आवश्यक ती कागदपत्रे जोडून तपशील द्यावा, मतदान हा आपला लोकशाहीचा अधिकार असून तो सगळयांनी अवर्जून बजवावा असे आवाहन त्यामधून विद्यार्थ्यांनी केले.त्यानंतर ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी फॉर्म भरण्याचे आवाहन जगताप यांनी केले. त्यानूसार तो कसा भरावा याचे प्रात्यक्षिक धडे देखिल युवकांनी घेतले. काहींनी तातडीने फॉर्म भरले, त्याचे संकलन करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले. महाविद्यालयातील अन्य प्राध्यापकांनीही उपक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांची रॅली यशस्वी केल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीcollegeमहाविद्यालय