शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांना निवडणुकीचे काम; न्यायालयाच्या आदेशानंतरही ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:08 IST

कोणतेही काम न करण्याचे बेमुदत ‘असहकार’ आंदोलन राज्यातील अंगणवाडीसेविकांनी गुरुवारपासून सुरू केले.

- सुरेश लोखंडे ठाणे : कोणतेही काम न करण्याचे बेमुदत ‘असहकार’ आंदोलन राज्यातील अंगणवाडीसेविकांनी गुरुवारपासून सुरू केले. एवढेच नव्हे तर निवडणुकीच्या कामांची सक्ती या सेविकांवर करू नये, असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. त्यानंतरदेखील मतदानकेंद्रांवरील कामांसाठी तीन हजार ५९१ अंगणवाडीसेविकांची नियुक्ती करून जिल्हा प्रशासनाने तसे आदेशही जारी केले.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मुंबई उच्च न्यायालयात ‘अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये’ या मुद्यांवर याचिका सादर केली होती. त्यासंबंधी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक व न्यायमूर्ती कर्णिक यांनी ‘महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर निवडणुकीच्या कामाची सक्ती करता कामा नये,’ असे आदेश दिले. निवडणुकीचे काम करू न इच्छिणाºया अंगणवाडी कर्मचाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करता कामा नये, असेही या आदेशात न्यायालयाने म्हटल्याचे याचिकाकर्ते राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील व सरचिटणीस बृजपालसिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.न्यायालयाच्या या आदेशाचा लाभ चौथ्या टप्प्यातील मतदान असलेल्या ठाणे, पालघर, रायगड आदींसह मुंबईतील् ४० हजार सेविकांना होईल. पण, या आधीच मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रांवरील कामांची जबाबदारी पार पाडण्याचे आदेश ठाणे जिल्हा प्रशासनाने जारी केल्याचे उघड झाले. सेविकांनी मार्चचे थकीत व एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच्या सुटीआधी देण्याच्या मागणीसाठी सेविकांनी आहारवाटपाचे काम करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित शासनाच्या सभा, योजना, त्यांचे अहवाल आदींसह निवडणुकीची कामे न करण्याचा असहकारही गुरुवारपासून बेमुदत सुरू केला आहे.निवडणूक कामाचा १३०० रुपये भत्ताठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभेच्या मतदानासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी 6715 मतदानकेंद्रे निश्चित केले आहेत.त्यासाठी मतदानाच्या दोन दिवस आधी व मतदानाच्या दिवशी मतदारांना चिठ्ठीवाटप करणे, मतदानकेद्रांवरील पाळणाघराचे काम, मतदान अधिकारी आदी कामांच्या जबाबदारीचे आदेश जिल्ह्यातील तीन हजार ५९१ अंगणवाडीसेविकांना आधीच जारी केले आहेत.त्यांचे निवडणूक प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत. त्यांच्या इच्छेनुसार या निवडणूक कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या मोबदल्यात त्यांनी अन्य अधिकारी, कर्मचाºयांप्रमाणेच सुमारे १२०० ते १३०० रुपये भत्ता त्वरित दिला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.