शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाची निवडणूक : राजकीय घडामोडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:38 IST

नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तारखा बदलण्यापासून नव्या तारखा जाहीर करण्यापर्यंतच्या सर्व प्रकरणात राजकीय हस्तक्षेप उघड होत आहे.

अंबरनाथ/बदलापूर : : नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तारखा बदलण्यापासून नव्या तारखा जाहीर करण्यापर्यंतच्या सर्व प्रकरणात राजकीय हस्तक्षेप उघड होत आहे. त्यामुळे सोपी वाटणारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता सोपी राहिलेली नाही हे स्पष्ट होत आहे.अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी अरविंद वाळेकर आणि पंढरी वारिंगे या दोन गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही गट आपापल्यापरीने हे पद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शहरात वातावरण तंग होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे. त्यातच आता नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्याने उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना आपल्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना करण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या आणि अपक्ष नगरसेवकांची देखील जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. भाजपा सत्तेत असली तरी भाजपाने आपला उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने नेमके भाजपा कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. भाजपा स्वत: सेनेच्या विरोधात उमेदवारी देण्याची तयारी करत असल्याने शिवसेनेनेही आकडेमोड करण्यास सुरूवात केली आहे. भाजपाच्या उमेदवारीमुळे सेनेला कोणताच त्रास नसला तरी शिवसेना गाफिल राहणार नाही हेही स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपाला सडेतोड उत्तर देण्यासाठी पालकमंत्री कोणती शैली वापरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर विरोधी पक्षाची भूमिका बजावणाºया काँग्रेसने अद्याप आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे सांभाळण्याची तयारी काँग्रेस व्यक्त करत आहे.बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपा हे प्रमुख दावेदार असले तरी भाजपाने उमेदवारीबाबत आपला निर्णय अद्याप स्पष्ट केलेला नाही. भाजपा सद्यस्थितीत बघ्याच्या भूमिकेत आहे. तर शिवसेनेच्या दोन गटात उमेदवारीसाठी संघर्ष निर्माण झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून नगरसेवक अ‍ॅड.प्रियेश जाधव आणि मोहन राऊत यांच्या पत्नी विजया राऊत यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र या दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अवलंबून आहे. बदलापूरमधील गटबाजी टाळण्यासाठी नगराध्यक्षपद हे सव्वा- सव्वा वर्ष वाटून देण्याची शक्याता आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ