शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी सदस्य निवडीत भाजपने दाखवला ओमी टीमला ठेंगा; श्रीकांत शिंदे घडविणार किमया?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 01:06 IST

उल्हासनगर पालिका : सभापती निवडणुकीत काढणार वचपा

उल्हासनगर : स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागी सोमवारी नवीन आठ सदस्यांची निवड झाली. या निवडीत भाजपने ओमी टीमला ठेंगा दाखविल्याने, सभापतीच्या निवडणुकीत वचपा काढण्याचे संकेत टीमकडून देण्यात आले. 

महापालिकेच्या स्थायी समितीमधील १६ पैकी आठ सदस्य एक एप्रिल रोजी निवृत्त होत आहे. निवृत्त सदस्यांच्या जागी सोमवारी भाजपचे जमनुदास पुरस्वानी, टोनी सिरवानी, साई पक्षाचे गजानन शेळके, शिवसेनेचे रमेश चव्हाण, स्वप्निल बागूल, आकाश पाटील तसेच रिपाइं व राष्ट्रवादी पक्षाचे भगवान भालेराव, सुनीता बगाडे या आठ सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीत भाजपचे आठ, शिवसेना पाच, रिपाइं एक व राष्ट्रवादी पक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. साई पक्षाचा भाजपला पाठिंबा असल्याने समितीमध्ये भाजपचे बहुमत आहे. मात्र गेल्यावर्षी भाजपचे बहुमत असताना भाजप बंडखोर विजय पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा देऊन सभापतीपदी निवडून आणले होते. भाजपने समिती सदस्यांमध्ये फूट पडू नये म्हणून पक्षाचे कट्टर सदस्य समितीत पाठविले. तर पक्षातील ओमी टीम समर्थक नगरसेवकांना ठेंगा दाखविला आहे. ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

भाजपचे शहराध्यक्ष पुरस्वानी म्हणाले की, पक्षातील ओमी टीम समर्थक नगरसेवकांना विशेष समिती सभापती पदासह प्रभाग समिती सभापतीपद दिले आहे. भाजपचाच सभापती निवडून येईल असा दावाही त्यांनी केला. 

श्रीकांत शिंदे घडविणार किमया?गेल्यावर्षी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी भाजपचे बंडखोर विजय पाटील यांना सभापतीपदी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगून, शिवसेना सदस्य सूचक, अनुमोदक राहिले. तसेच भाजपचे समिती सदस्य असलेल्या डॉ. प्रकाश नाथानी यांना आयुक्तांकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः नेऊन सदस्यपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यामुळे भाजप बंडखोर पाटील सभापतीपदी निवडून आले. तशीच किमया यावर्षी खासदार करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा