शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट प्रक्रिया द्वारे वृद्धेच्या बदलली हृदयाची झडप

By धीरज परब | Updated: March 14, 2024 16:16 IST

हीरा मिश्रा यांना दोन वेळा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दोन अँजिओप्लास्टी करण्यात आल्या. नंतर दोन स्ट्रोकचे निदान झाले . त्यांच्या हृदयाची महाधमनी व्हॅाल्व्ह अरुंद झाल्याचे दिसून आले.

मीरारोड - कोमॉर्बिडीटीज, दोन स्ट्रोक आणि दोन अँजिओप्लास्टीची वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या ७२ वर्षीय वृध्द महिलेच्या हृदयाची झडप ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट प्रक्रिया द्वारे चिरफाड न करता बदलण्यात डॉक्टरांना यश आले . 

हीरा मिश्रा यांना दोन वेळा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दोन अँजिओप्लास्टी करण्यात आल्या. नंतर दोन स्ट्रोकचे निदान झाले . त्यांच्या हृदयाची महाधमनी व्हॅाल्व्ह अरुंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शारीरिक हालचालींवर निर्बंध येऊन चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे आणि श्वासोच्छवासासंबंधी त्रास होऊ लागला. यासाठी अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 

मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर तावी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.  इंटर्वेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनुप ताकसांडे, कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक आणि हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. मयुरेश प्रधान आणि स्ट्रक्चरल हार्ट डिसीज इंटरवेंशन कार्डिओलॉजिस्ट आणि तज्ञ डॉ. माणिक चोप्रा यांच्या पथकाने ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट प्रक्रिया करण्यात आली. 

डॉ अनुप ताकसांडे म्हणाले कि , रुग्णाची प्रकृती गंभीर होती.  महाधमनी व्हॅाल्व्ह अरुंद होत होता. एओर्टिंक स्टेनोसिसचे निदान झाले. या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत. रक्तप्रवाहामध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळे येतात व ते कमकुवत होते. कोरोनरी आर्टरी डिसीज, स्ट्रोक आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज यांसारख्या कॉमोरबिडीटी असलेल्या ६५ वर्षांवरील वृद्धांमध्ये ही स्थिती दिसून येते. ६५ वर्षांवरील लोकसंख्येपैकी सुमारे ०.५% ते १% टक्के लोकांना कॅल्सिफिक एओर्टिंक वाल्व्ह स्टेनोसिसचा त्रास होतो. 

टीएव्हीआय शस्त्रक्रिया रोगग्रस्त महाधमनी (एओर्टिक) व्हॉल्व्ह रोपण करण्यासाठी केली जाते. ही आधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची विनाटाक्यांची शस्त्रक्रिया आहे. यामध्ये ओपन हार्ट सर्जरी करायची आवश्यकता नसते. यात विकृती आणि मृत्यूचा धोका कमी करता येतो . ही प्रक्रिया सौम्य ऍनेस्थेसिया देऊन  केली जाते आणि रुग्णाच्या मांडीमध्ये सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते. या प्रक्रियेस केवळ ३० मिनिटे लागतात. या रुग्णाला एका दिवसासाठी आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि १२ तासानंतर हा रुग्ण चालू फिरु लागला असे डॉक्टर म्हणाले .