शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात भांडणानंतर घराबाहेर पडलेल्या धाकटयाचा मोठया भावाने दात पाडला: मोठयाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:59 IST

भांडणाचा वचपा काढण्यासाठी धाकटया भावाला जबर मारहाण करुन त्याचा दात पाडणा-या गाझी शेख या मोठया भावाला राबोडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही हाणामारीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देभांडणाचा वचपा काढण्यासाठी केला हल्लाराबोडी पोलिसांची कारवाईपोलिसांनी केला लोखंडी रॉड हस्तगत

ठाणे : मोठया भावाबरोबर होणा-या नेहमीच्या वादाला कंटाळून घराबाहेर पडलेल्या मेहमूद शेख (३६) या धाकटया भावाला रॉडने डोक्यावर मारहाण करीत त्याचा दात पाडणा-या गाझी (४०) या मोठया भावाला राबोडी पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होता.गाझी आणि मेहमूद हे दोघेही ठाण्याच्या आझादनगर येथील युनायटेड २१ या हॉटेलसमोर वास्तव्याला आहेत. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून क्षुल्लक बाबींवरुन खटके उडत होते. याच वादाला कंटाळून मेहमूद ५ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. धाकटा भाऊ घराबाहेर पडल्यामुळे मोठा पुन्हा त्याच्या मागे समजूत काढण्यासाठी बाहेर पडला. त्याने समजूत काढण्याऐवजी मेहमूदच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. तसेच तोंडावर लाथाबुक्कयांनी मारहाण करुन त्याचा एक दात पाडला. त्यानंतर छातीवर पोटावरही त्याला जबर मारहाण केली. यात जखमी झालेल्या मेहमूदला नातेवाईकांनी ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे. हल्ल्यानंतर पसार झालेल्या गाझीलाही पोलीस निरीक्षक दिलीप रासम यांच्या पथकाने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून लोखंडी रॉडही पोलिसांनी जप्त केला आहे. ठाणे न्यायालयाने त्याला ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.पत्नीही माहेरी गेली...गाझीला दारुचेही व्यसन आहे. नशेतच त्याला भांडणाची सवय आहे. भावाप्रमाणेच पत्नीबरोबरही त्याचे अनेकदा भांडण झाले आहे. तिलाही तो दारुच्या नशेत मारहाण करीत होता. सततच्या भांडणाला कंटाळून तीही घर सोडून गेली आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात मारहाणीच्या तक्रारी दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेcommunityसमाज