शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"मदत करताना एकनाथ शिंदे यांच्यात आपलेपणाची भावना"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:34 IST

सचिन पिळगावकर यांचे मत

ठाणे : संकटात मदतीला धावताना पालकमंत्री एकनाथ शिंदे माणूस म्हणून धावतात. मदत करताना ‘आपला माणूस’ ही भावना त्यांच्या मनात असते. समोरच्याला मदत करताना ते कोणताही राजकीय पक्ष पाहत नाहीत, अशी माणसे समाजात कमी आहेत, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सोमवारी व्यक्त केल्या.पालकमंत्री शिंदे यांच्यावर आधारित ‘अनाथांचा नाथ एकनाथ... एक संगीतमय प्रवास’ या ध्वनिचित्रफितीचा अनावरण सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. हे गीत ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी लिहिले असून त्यांच्या आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या गीताला चिनार महेश यांनी संगीत दिले आहे. हे गाणे अवधूत गुप्ते यांनी गायिले आहे. यावेळी पिळगावकर यांच्या हस्ते ध्वनिचित्रफितीचे विमोचन करण्यात आले. शिंदे हे ठाण्याचे पालकत्व स्वीकारणारे खऱ्या अर्थाने पालकमंत्री आहेत. मी अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे आहेत. त्यांनी कोरोना काळात जे कार्य केले त्यातील काही क्षणांचा मी स्वतः साक्षीदार आहे. ते केवळ अनाथांचे नाही तर अनेकांचे, सर्वांचे नाथ आहेत. हे गीत भविष्यात ठाणे गौरव गीत व्हावे अशी इच्छा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली. पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा म्हणाले की, मी देखील त्यांनी केलेल्या कार्याचा साक्षीदार आहे. यावेळी महाडच्या दुर्घनटनेचा प्रसंग त्यांनी सांगितला. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले, मी त्यांची धार आणि आधार हे दोन्ही पाहिले आहेत. शिंदे हे केवळ एकनाथ नव्हे तर लोकनाथ, जगन्नाथ व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. दिघेंच्या आठवणींना उजाळा१९८४ ला मी शाखा प्रमुख झालो तेव्हा मी २० वर्षांचा होतो. मी आनंद दिघे यांच्या सानिध्यात राहिलो. त्यावेळी अनेक आंदोलने केली. आनंदाश्रमात त्यांच्याकडून कार्यपद्धती शिकलो, हे सांगताना त्यांनी दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शाखाप्रमुख ते मंत्री पदापर्यंतचा प्रवासात कठीण प्रसंग, संघर्ष आहे. दुसरीकडे समाधानही आहे. मी शिवसेनेचा नेता असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता  जिवंत ठेवला, असे शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSachin Pilgaonkarसचिन पिळगांवकर