शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde Vs Shiv sena: ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचीही शिवसेनेने केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 15:31 IST

Eknath Shinde Vs Shiv Sena: शिंदे समर्थकांच्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यानुसार जिल्हा प्रमुख पदावरुन नरेश म्हस्के यांची  हकालपट्टी केल्यानंतर मंगळवारी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची देखील पक्षातून हकालपट्टी  करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 ठाणे - शिंदे समर्थकांच्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यानुसार जिल्हा प्रमुख पदावरुन नरेश म्हस्के यांची  हकालपट्टी केल्यानंतर मंगळवारी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची देखील पक्षातून हकालपट्टी  करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आता ठाण्यातून अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक पुढे येत आहेत. त्यांच्या माध्यमातून शिंदे यांना जाहीर समर्थनही करण्यात आले आहे. परंतु आता अशा बंडोबांचा समाचार घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. त्यानुसार शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या नरेश म्हस्के यांची दोन दिवसापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्ष विरोधी कारवाया वाढू लागल्याने शिवसेनेकडून ही पावले उचलण्यात येत आहेत. परंतु त्यांच्या जागेवर अद्यापही शिवसेनेकडून दुसरे नाव जाहीर झालेले नाही. या यादीत केदार दिघे आणि सुभाष भोईर यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु त्या बाबतचा निर्णय अद्यापही शिवसेनेने जाहीर केलेला नाही.

दुसरीकडे शिवसेनेतील महिला गटातील आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या माजी महापौर तथा जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची देखील आता शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांच्या समर्थकांमध्ये त्या सामील झाल्याने त्यांच्यावर देखील ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांना हा आणखी एक धक्का मानला जात आहे. मीनाक्षी शिंदे या शिवसेनेच्या रणरागिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. परंतु त्यांनी देखील पक्ष विरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना