शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील जलसाठे विकसीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 15:23 IST

मुरबाडच्या खेवारेजवळील आरव जलसिंचन योजनेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि ग्रामीण भागातील पाझर तलाव, जलसाठे विकसीत करण्यासाठी शासकीय निधीच्या माध्यमातून कमी खर्चाच्या शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे या तलावांमध्ये पाणी साठा वाढून त्याचा वापर शेतीसाठी करणे शक्य होईल, अशी अपेक्षा नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री. एकनाथ शिंदे यांनी केली. 

मुरबाड तालुक्यातील खेवारे आरव जलसिंचन योजनेच्या लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, माजी आमदार दिगंबर विशे, वसुंधरा मंडळाचे संस्थापक आनंद भागवत, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, उद्योजक विश्वजीत नामजोशी आदी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या या पाझर तलावातील पाण्याच्या वापरासाठी शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा उपसा केला जाणार आहे. त्यामुळे पाणी साठा वाढून त्याचा वापर परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर करता येईल. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी निधी देण्यात आल्याचे सुतोवाच शिंदे यांनी केली.

या तलावात सुमारे ५० कोटी लिटर पाणी साठा आहे. ज्या तंत्रज्ञानाने पाणी उपसा केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना खरीपाबरोबरच रब्बीमध्ये दुबार पीके घेता येतील. या तलावातील पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी हळद, भेंडी, मिरची या सारखे  पीके घेऊन उत्पादन वाढवावे,असे आवाहनही शिंदे यांनी केले.

या पाझर तलावासाठी पाणी साठा वाढविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्यात यावा. तसेच परसिरातील शेतकऱ्यांचा समुह करून मोठ्या प्रमाणावर एकाच पिकाची लागवड करावी जेणेकरून पिकांचं क्लस्टर तयार होऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल. यासाठी शासकीय योजनांमधूनही निधी मिळेल. शेतकऱ्यांनी देखील  पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, अशी अपेक्षा ही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

ग्रामीण भागातील असलेले तलाव, जलस्त्रोतातील पाणी साठा वाढविण्यासाठी पावसाळ्यापूर्वी त्याचे संवर्धनाचे काम झाले पाहिजे त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मदत केली जाईल, अशी ग्वाही मंत्री  शिंदे यांनी दिली.‌यावेळी माजी आमदार विशे, डॉ. विलास सुरोसे,  वाघ, नामजोशी, यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रकल्पासाठी शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करणारे आयआयटीचे प्रा.डॉ, प्रदीप काळबर, संदीपक अध्यापक, प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य करणारे नामजोशी, डॉ. सुरोसे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आनंद भागवत यांनी आभार मानले. 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे