शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मे अखेर कोपरी पुलावरून धावणार आठपदरी वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 00:10 IST

एकनाथ शिंदे यांची माहिती : जकातनाक्यांच्या जागेवर अतिरिक्त मार्गिका

ठाणे : नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोपरी पुलाच्या पायलिंगचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या स्लिप गर्डरचे काम पालघर येथे सुरू आहे. फेब्रुवारी महिनाअखेर पायलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील अडीच महिन्यांत गर्डरचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर अस्तित्वातल्या जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंना नव्याने उभारल्या जाणाºया या पुलांवरून वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. त्यानंतर, जुना पूल पाडून त्या ठिकाणी मे २०२० अखेरपर्यंत नव्या पुलाची उभारणी करून आठपदरी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती मंगळवारी राज्याचे नगरविकास तथा गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिगृहात आयोजित बैठकीत दिली.

कोपरी पुलाच्या रु ंदीकरणाच्या कामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याच्या प्रवेशद्वारापाशीच मोठी वाहतूककोंडी होते. त्याची गंभीर दखल घेऊन शिंदे यांनी मंगळवारी संबंधित विभागांची ही बैठक बोलावली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंते विनय सुर्वे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे आदी अधिकारी तिला उपस्थित होते. 

मनुष्यबळ वाढविण्याची सूचनारेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकाºयांना आदेश दिले. त्यासाठी मनुष्यबळ आणि कामाचा वेग वाढवून रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करण्यास बजावले आहे. या कामामुळे होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची रु ंदी वाढवा. मुंबई महापालिकेच्या बंद जकातनाक्याच्या जागेतून पर्यायी मार्गिका सुरू करून शक्य असेल, तिथे मुख्य रस्त्यावरील दुभाजक हटवून रस्त्याची रु ंदी वाढवा, अशा उपाययोजनाही त्यांनी यावेळी सुचविल्या आहेत.

मुंबई महापालिका देणार जकातनाक्यांची जागापुलाचे काम करताना वाहतूक पोलिसांकडून आवश्यक परवानग्यांबाबत सहकार्य मिळाले, तर कामाचा वेग वाढवता येईल, असे मत रेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी यावेळी मांडले. त्यानंतर, शिंदे यांनी ठाण्याचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमित काळे यांना फोन करून आवश्यक असलेल्या परवानग्या तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या बंद जकातनाक्याची काही जागा मिळाली, तर तिथून पर्यायी मार्गिका सुरू करणे शक्य आहे. शिंदे यांनी त्याबाबतच्या सूचना दिल्यानंतर ही जागा तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रवीण दराडे यांनी स्पष्ट केले. या कामाच्या साप्ताहिक अहवाल सादर करण्याच्याही सूचना रेल्वे आणि एमएमआरडीएला केल्या.नव्या ठाणे स्थानकासाठी सर्वंकष आराखडाभविष्यात या ठिकाणी नवे रेल्वेस्टेशन उभारले जाणार आहे. त्यामुळे तीनहातनाक्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढेल. ती सुरळीत पद्धतीने व्हावी, यासाठी ग्रेड सेपरेटर, भुयारीमार्ग व पर्यायी रस्त्यांचे जाळे निर्माण करणे क्र मप्राप्त आहे. त्याची रूपरेषा ठरविण्यासाठी आणि संभाव्य अडथळ्यांवर कशी मात करता येईल, यासाठी एमएमआरडीएसह मुंबई आणि ठाणे महापालिका अधिकाºयांनी संयुक्त बैठका घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बैठकांना सुरुवात होणार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे