शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

रवी पुजारी टोळीतील आठ जणांना अटक

By admin | Updated: October 31, 2015 00:01 IST

उल्हासनगरच्या केबल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून त्याची हत्या करणाऱ्या रवी पुजारी टोळीतील आठ जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

ठाणे : उल्हासनगरच्या केबल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून त्याची हत्या करणाऱ्या रवी पुजारी टोळीतील आठ जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि पाच काडतुसे हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.प्रवीण पाटील (२५), प्रशांत सपकाळ (२९), रा. दोघेही रा. कुची, जि. सांगली, मिर्चू शर्मा (४६), रा. उल्हासनगर, शफिक शेख (३७), नामदेव आढाव (४०) रा. दोघेही अंबरनाथ तसेच नितीन आघडे, कैलास प्रधान आणि सचिन लोंढे अशी अटक केलेल्या आठ जणांची नावे आहेत. रवी याने त्याच्या टोळीतील सहकारी सुरेश पुजारी याला ठाणे, उल्हासनगर आणि अंबरनाथ या परिसरातील राजकीय व्यक्ती आणि बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन करण्यासाठी सांगितले होते. त्यावरून सुरेशने बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या भागातील बांधकाम व्यावसायिक सच्चानंद कारिरा याच्याकडे त्याने खंडणीची मागणी केली होती. त्यांनी ती न दिल्याने त्याच्या टोळीतील साथीदारांच्या मदतीने ११ सप्टेंबर २०१५ रोजी कारिरा यांची त्यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयात गोळ्या घालून हत्या केली. या खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आणि शार्पशूटर नितीन औघडेला पोलिसांनी तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर, रवी आणि सुरेश पुजारी टोळीतील गुन्हेगारांची ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने राज्यात आणि राज्याबाहेर तपास करून या खुनाशी तसेच खंडणीच्या गुन्ह्यांशी संबंधित टोळीला २२ ते ३० आॅक्टोबरदरम्यान अटक केली. त्यांच्यापैकी शफिक याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि दोन काडतुसे तसेच नामदेव याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि चार काडतुसे जप्त केली.