शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

आठ लाख १८ हजार मतदारांची छायाचित्रे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:58 IST

मतदार यादीतून नावे वगळणार : मतदारांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे केले आवाहन

सुरेश लोखंडेलोकमत न्यूजनेटवर्कठाणे : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये ६६ लाख ३७ हजार २२७ मतदारांचा समावेश आहे. यापैकी आतापर्यंत तब्बल आठ लाख १७ हजार ९७९ मतदारांचे छायाचित्र नसल्याचे उघड झाले आहे. या मतदारांनी त्यांचे छायाचित्रे न दिल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याकडे मतदारांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित करून आपल्या मतदारसंघातील निवडणूक शाखेला छायाचित्र उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील शहापूर व भिवंडी हे दोन मतदारसंघ एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर अंबरनाथ मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहे. अन्य प्रवर्गासाठी उर्वरित १५ मतदारसंघ जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचे शहरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात वाढ होऊन अन्य राज्यातील लोकांना मुंबईजवळील ठाणे जिल्हा निवासस्थानास रोजगारासाठी आकर्षित करीत आहे. सध्या जिल्ह्यात सहा महापालिका असल्याने जिल्हा देशात अव्वल स्थानी आहे. येथील तब्बल ६६ लाख ३७ हजार २२७ नागरिकांना मतदानाचा हक्क बहाल झाला आहे. यामध्ये ३६ लाख १० हजार ९३३ पुरुषांसह ३० लाख ३७ हजार २७२ स्री मतदारांचा समावेश आहे.  या मतदारांपैकी बहुतांशी मतदार शहरी भागात वास्तव्याला आहेत.या १८ मतदारसंघातील ५८ लाख १९ हजार २४८ मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र आहेत. उर्वरित १२.३२ टक्के म्हणजे आठ लाख १७ हजार ९७९ मतदारांचे छायाचित्र नसल्याचे निदर्शनात आले आहे. 

५८ लाख जणांकडे ओळखपत्रमतदानाचा हक्क बहाल झालेल्या ५८ लाख ९१ हजार ६६ मतदारांकडे मतदान ओळखपत्र आहे, तर सात लाख ४६ हजार १६१ (११.२४टक्के) मतदारांकडे मतदान ओळखपत्राचा अभाव आहे. मतदार यादीतील छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र संबंधित मतदारांकडे अपेक्षित असल्याचे आयोगाने नमूद केलेले आहे. अन्यथा, संबंधितांची नावे वगळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील मतदार नोंदणीचे कार्य आयोगाच्या आदेशानुसार वेळोवेळी केले जात आहे. त्यानुसार आजपर्यंत ६६ लाख ३७ हजार २२७ मतदारांची नोंद झाली आहे. यापैकी ५८ लाख १९ हजार २४८ मतदारांची छायाचित्रे आहेत. तर आठ लाख १७ हजार ९७९ मतदारांची छायाचित्रे प्राप्त करण्यासाठी आदेशानुसार कार्यवाही केली जात आहे.- अपर्णा सोमाणी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे