शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मौज प्रकाशन गृहचे संपादक-प्रकाशक संजय भागवत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:13 IST

मौज प्रकाशन गृहचे संपादक - प्रकाशक संजय भागवत यांचे रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये सोमवारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देठाण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वासपक्षाघाताने होते आजारीविलेपार्ले येथे होणार अंत्यसंस्कार

ठाणे: मुंबईतील मौज प्रकाशन गृहचे संपादक - प्रकाशक संजय भागवत यांचे रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी भाग्यश्री, मानसोपचार तज्ज्ञ मुलगी मनवा, मॅनेंजमेंटचे शिक्षण घेणारा मुलगा अनिरुद्ध आणि मोठे भाऊ श्रीकांत असा परिवार आहे.अनेक नामांकित पुस्तकांचे प्रकाशन करणारी संस्था म्हणून मौज प्रकाशनची ओळख आहे. या प्रकाशन गृहाचे माजी संपादक तथा प्रकाशक श्रीकृष्ण भागवत यांच्या निवृत्तीनंतर १९९७ पासून ते २०१५ पर्यंत संजय भागवत यांनी प्रकाशक म्हणून मौजची धूरा सांभाळली. १९९७ आधी ते मौजच्या प्रिटींग विभागात काम करीत होते. २०१५ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांच्यावर अंधेरीमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच रुग्णालयाच्या ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील एका युनिट मध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. रविवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.उत्कृष्ट प्रकाशकासाठी देण्यात येणाऱ्या श्री. पु. भागवत या राज्य पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे. श्री. पु. भागवतांपासूनची उत्कृष्ठ लेखन सामग्रीच्या प्रकाशनाची परंपरा त्यांनी राखली होती.त्यांच्यावर विलेपार्ले पूर्व येथील सहार रोडवरील पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये सोमवारी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांचे थोरले बंधू श्रीकांत भागवत यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यDeathमृत्यू