शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गणेशोत्सवही होतोय इकोफ्रेण्डली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:45 IST

यंदा बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इकोफ्रेण्डली सजावटीवर भर देणार आहेत.

ठाणे : यंदा बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इकोफ्रेण्डली सजावटीवर भर देणार आहेत. काही शाडूच्या मूर्तींनाही पसंती देत आहेत. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवही यंदा इकोफ्रेण्डली होणार आहे. वेळेत सजावट पूर्ण करण्यासाठी मंडळाची लगीनघाई सुरू आहे.ठाण्यात इकोफ्रेण्डली ही संकल्पना चांगलीच रुजली आहे. गणेशोत्सव आरास स्पर्धेत उतरणारी मंडळे हमखास इकोफ्रेण्डली सजावट करतात. यंदा बहुतांशी मंडळे हीच संकल्पना सजावटीच्या माध्यमातून राबवित आहे. कागद, लाकूड, कार्डबोर्डसारख्या साहित्यांचा वापर करीत आहेत. सोशल मीडिया ते सैनिकांपर्यंतचे विषय मंडळांकडून हाताळले जात आहेत. सजावटीबरोबर काही मंडळे शाडूच्या मातीच्या मुर्तीला पसंती देत आहेत. अवघ्या पाच दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. या धर्तीवर मंडळांची सजावटीच्या कामाची लगीनघाई सुरू आहे. बुधवारपर्यंत सजावट पूर्ण करण्याची डेडलाईन ठरविली आहे. जसा वेळ मिळेल तसे परिसरातील नागरिक मदतीसाठी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.>सजावटीची तयारी आताच सुरू झाली आहे. यंदा आम्ही सोशल मीडिया आणि नातेसंबंध हा विषय हाताळत आहोत. पाच वर्षांपासून आम्ही थर्माकोलच्या सजावटीला बाजूला सारून केवळ कार्डबोर्ड आणि पेपरचा वापर करुन सजावट करीत आहोत. मूर्ती आधीपासूनच शाडूच्या मातीची आणतो.- प्रमोद सावंत, अध्यक्ष,श्रीरंग गणेशोत्सव मंडळदेशी गायीचेच दूध वापरा असा संदेश यंदाच्या सजावटीमधून आम्ही देणार आहोत. ही सजावट पर्यावरणस्नेहीच असेल. मातीच्या मूर्तीला तडे जातात म्हणून आम्ही शाडूची मातीची मूर्ती आणणे बंद केले.- जितू सावंत, सल्लागार,श्री साईकृपा मित्र मंडळ

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव