शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणस्नेही मखरांना परदेशातही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 02:41 IST

थर्माकोलच्या मखरांवर बंदी आल्याने कापड, हॅण्डमेड पेपर, चटया आणि पुठ्ठे अशा पर्यावरणस्नेही साहित्यांपासून बनवलेली मखरे बाजारात आली आहेत.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : थर्माकोलच्या मखरांवर बंदी आल्याने कापड, हॅण्डमेड पेपर, चटया आणि पुठ्ठे अशा पर्यावरणस्नेही साहित्यांपासून बनवलेली मखरे बाजारात आली आहेत. डोंबिवलीतील भाविकांना त्याची भुरळ पडली आहे. मखरविक्रेत्यांनी बनवलेली ही मखरे सातासमुद्रापार गेली आहेत.मखरविक्रेते मयूरेश गद्रे म्हणाले, आठ वर्षांपासून आम्ही पर्यावरणस्नेही मखर बनवत आहोत. यंदा बनवलेली पर्यावरणस्नेही मखरे कोल्हापूर, पुणे, वसई, नालासोपारा, इंदूर, दुबई, आॅस्ट्रेलिया येथे गेली आहेत. राज्य सरकारने बंदी घालण्यापूर्वीच आम्ही थर्माकोलची मखरे बनवणे बंद केले. कागदापासून बनवलेल्या मखरांना मोठी मागणी आहे. १५ पासून ४० इंचांपर्यंतचे मखर ६०० ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. थर्माकोलबंदीबाबत ग्राहकांमध्ये चांगली जागृती झाली आहे. त्यामुळे ग्राहक थर्माकोलचे मखर खरेदी करत नाहीत. कागदापासून मोठ्या आकाराचे मखर बनवण्यास मर्यादा येत असल्याने ग्राहकांनी लहान मूर्ती खरेदी करण्याची गरज आहे.कागदांच्या किमती वाढल्याने त्यापासून बनवलेल्या मखरांची किंमतही १५ टक्क्यांनी वाढली आहे. कागदी मखरांमध्ये ४० डिझाइन, चटयांमध्ये आठनऊ डिझाइन, कापडामध्ये १० ते १२ विविध प्रकार उपलब्ध आहेत. कागदी मखरांना चांगला सपोर्ट दिला आहे. त्यामुळे ती हवेने हलण्याची भीती नसल्याचे गद्रे यांनी सांगितले.>ग्राहकांची मागणीवसंत वाघ यांनी प्लायचा वापर करून मखरे तयार केली आहेत. त्यात सिंहासन, कोयरी, छत्री असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. मखर फोल्डिंग असल्याने ग्राहक त्यांना पसंती देत आहेत. ही मखरे १८०० रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, असे वाघ यांनी सांगितले.