शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

कचऱ्यात फेकलेल्या भाज्या खाऊन भरताहेत पोट, कचरावेचक महिलांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:21 AM

दोनवेळचे जेवण कसेबसे मिळवायचे, यासाठी रोजंदारीवर काम करणारा कामगारवर्ग चिंतेत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, काही राजकीय पक्षांकडून अन्नधान्य, जेवणवाटप केले जात होते.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : कचºयात फेकलेली भाजी घरी आणून स्वच्छ धुऊन घेतो आणि तीच शिजवून भातासोबत खातो. घरात फक्त दोन किलो तांदूळ आहे. आजूबाजूच्या लोकांचेदेखील असेच हाल आहेत. ज्याच्या घरात जे असेल ते एकमेकांना देत दिवस ढकलत आहोत. घरात अठरा विश्व दारिद्रय म्हणजे काय असते, त्याची जाणीव या लॉकडाऊनने करून दिली, अशी व्यथा कचरावेचक महिला तुळसा भोसले हिने ‘लोकमत’कडे मांडली. हातावर पोट असणाºया इतर कष्टकरीवर्गानेही लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडल्याची खंत व्यक्त केली आहे.दोनवेळचे जेवण कसेबसे मिळवायचे, यासाठी रोजंदारीवर काम करणारा कामगारवर्ग चिंतेत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, काही राजकीय पक्षांकडून अन्नधान्य, जेवणवाटप केले जात होते. परंतु, अनलॉकनंतर पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यावर अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे घरेलू कामगार, रिक्षाचालक व इतर कष्टकरीवर्गाने सांगितले. अनलॉकमध्ये रिक्षा चालवायला सुरुवात केली. थोडे पैसे आले तेवढ्यात पुन्हा लॉकडाऊन केले आणि आमची पुरती निराशा झाली, असे रिक्षाचालकांनी सांगितले.अद्याप घरकामासाठी कोणत्याही घरमालकाने बोलाविले नाही, सुरुवातीला काही कुटुंबांनी पगार दिला, पण आता तोही बंद झाला आहे, अशी व्यथा घरकाम करणाºया महिलांनी व्यक्त केली.कचरावेचक महिला लॉकडाऊनमध्ये कचरा वेचायला जातात आणि तो घरी आणून साठवून ठेवतात. लॉकडाऊन संपले की, हा कचरा विकून येणाºया पैशात संसाराचा गाडा हाकणार असल्याचे त्या म्हणाल्या. कचरा उचलायला जाताना कचºयात भाज्या फेकून दिलेल्या असतात, मग त्याच घरी आणून शिजवतो. पोटापाण्यासाठी वणवण भटकावेच लागते. आता कोणी मदत देत नाही, आम्ही तर मदत देण्याचे आवाहन करणारा फलक पण लावला आहे. एकमेकांना साथ देत आयुष्याची गाडी पुढे ढकलत आहोत, असे कचरावेचक तुळसा भोसले आणि पारू राठोड यांनी सांगितले.मुलींच्या शिक्षणाची फी सध्या भरू शकत नाहीमी लॉकडाऊनपासून घरी आहे, मी स्वयंपाकाची काम करते, पण लॉकडाऊनपासून कोणी बोलवत नाही. कोणी आमचे फोनही उचलत नाहीत. सध्या चहाचपाती खाऊन दिवस काढत असल्याचे दुर्गा वाघमारे यांनी सांगितले.मी नऊ घरची कामे करत होते. लॉकडाऊनमुळे सध्या ती बंद आहेत. सुरुवातीला एक महिना मला पगार दिला, पण त्यानंतर फक्त आता एका घरातून पगार सुरू आहे.घराची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मुलींच्या शिक्षणाची फी देखील भरू शकत नाही, मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे, असे जयश्री पडवळ यांनी सांगितले.उधारीवर चाललेय घरअनलॉक सुरू झाला तेव्हा १० ते १२ दिवस रिक्षा चालवली. पण, लॉकडाऊनमुळे पुन्हा काम बंद झाले. सध्या माझे घर उधारीवर चालत आहे, असे रिक्षाचालक भाऊसाहेब पवार यांनी सांगितले. सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळात मदत येत होती, पण त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आणि अनेकांना मदत मिळणेही बंद झाले आहे. लॉक-अनलॉकमुळे गरीबवर्गाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

टॅग्स :thaneठाणे