शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

खा. राजन विचारेंची सुरक्षा का कमी केली? संबंधित अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 13:22 IST

Court News: शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सुरक्षा पूर्ववत करण्यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले.

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सुरक्षा पूर्ववत करण्यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले. तसेच विचारे यांच्या  सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ज्या अहवालाआधारे घेण्यात आला, तो अहवालही सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.

याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिवादी करण्याबाबत न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने प्रश्न उपस्थित करत त्यांची नावे याचिकेतून प्रतिवादी म्हणून वगळण्याची सूचना विचारे यांना केली. सुरक्षा कपात करण्याबाबत याचिकादाराला माहिती देण्यात आली होती का? असा प्रश्न न्यायालयाने विचारे यांचे वकील नितीन सातपुते यांना केला. त्यावर त्यांनी याबाबत सरकारने काहीही माहिती न दिल्याचे न्यायालयाला सांगितले.

विचारे यांची सुरक्षा काढण्यात आली नसून सुरक्षेत कपात करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी वकील अरुणा पै कामत यांनी न्यायालयाला दिली. निर्भया निधीतून खरेदी करण्यात आल्याचा वाहनांचा उपस्थित केलेला मुद्दा त्यांनी याचिकेतून मागे घेण्याची तयारी दर्शविली.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय