शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाने पुन्हा हादरले डहाणू-तलासरीवासी; तीन वर्षांपासून भूकंप-मालिका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 23:38 IST

डहाणूतील धुंदलवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू, अनेक घरांची पडझड आणि भिंतींना तडे

कासा/तलासरी : पालघर जिल्ह्यातीतल डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे बसत असून यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाने काही घरांची पडझड, तर हजारो घरांच्या भिंतींना आतापर्यंत तडे गेले आहेत. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन्ही तालुक्यांतील गावांमधील अनेक घरांचे आतापर्र्यंत नुकसान झाले असून मागील वर्षी दोघांचा भूकंपाने मृत्यू झाला होता.

डहाणूमध्ये सोमवारी सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा हादरा बसला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत लहान-मोठे भूकंपाचे धक्के बसत असून ४ आणि ५ सप्टेंबर रोजी एकूण चार भूकंपाचे धक्के बसले होते. हे भूकंपाचे धक्के विशेषत: डहाणू आणि तलासरी ग्रामीण आणि किनारपट्टीतील गावांना बसले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून काही ठिकाणी नागरिकांनी रात्र जागून काढली. ४ सप्टेंबर रोजी बसलेल्या चार धक्क्यांमध्ये ४ रिश्टर तीव्रतेचा सर्वाधिक मोठा धक्का बसला होता. त्या भूकंपाच्या हादऱ्याची तीव्रता धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, आंबोली, धानिवारी, ओसारविरा, महालक्ष्मी, सोनाळे, कासा, चारोटी, पेठ, उर्से आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाणवली होती.

दरम्यान, भूकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. भूकंप हादऱ्यांनी घरांचे छप्पर, भांडी हलत असल्याने धुंदलवाडी परिसरातील नागरिकांना भीतीने रात्र घराबाहेर काढावी लागत असल्याचे संदीप भसरा व नरेश भोये यांनी सांगितले. भूकंपाची झोपड्यांपेक्षा पक्क्या घरांना तीव्रता अधिक जाणवली. ४ सप्टेंबरच्या भूकंपाच्या हादºयाने डहाणू तालुक्यातील सासवंद गावातील धर्मा डोंबरे या आदिवासी शेतकºयाचे घर कोसळले, तर चिंचले गावातील दत्तू पडवळे यांच्या घराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले.

दुहेरी संकटात सापडले नागरिक

च्सुदैवाने या दोन्हीही घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर काही गावांतील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. जिल्ह्यात३ नोव्हेंबर २०१८ पासून भूकंपाचे धक्के बसत असून आजवर हजारो घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. च्एकीकडे कोरोना संकट तर दुसरीकडे भूकंपाची भीती या दुहेरी संकटात येथील नागरिक सापडले आहेत. त्यांना भीतीने जीवन जगावे लागत आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यात मागील वर्षी भूकंपात घर कोसळून बेंडगाव येथील रिश्या मेघवाले यांचा मृत्यू झाला होता, तर हळदपाडा येथील वैभवी भुयाल या चिमुकलीला जीव गमवावा लागला होता.

टॅग्स :Earthquakeभूकंप