शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; घरांना हादरा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 13:23 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

हितेन नाईक, पालघर : जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यातील डहाणू, गांजा, कासा या परिसरामध्ये ३.६ रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. शनिवारी साडेसहा वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

पालघरमध्ये ६ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे धक्काे बसले. पालघरच्या डहाणू , कसा, गांजड आणि इतर परिसरामध्ये सकाळी ६ वाजून ३५ मिनिटे ४१ सेकंदांनी भूकंपाचे धक्के बसले असून त्याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. हे धक्के १० किलोमीटर खाली होते,  तर १९.८७ अक्षांश आणि ७२.७६ रेखांश दिशेला तसेच मुंबई व नाशिक आणि गुजरातमधील वापीपासून हा भूकंपाचा केंद्र बिंदू जवळ होता. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून  माहिती जाहीर करण्यात आली आहे,

पालघर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे काही घरांना हादरे बसले आहेत.  त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :palgharपालघरEarthquakeभूकंप