शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या रस्त्यावर धावणार ई-रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 08:43 IST

चाचणी शांततेत; नागरिकांकडून स्वागत : शालेय विद्यार्थी, ज्येष्ठांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी माथेरानमध्ये अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि स्थानिकांच्या साथीने शांततेत ई रिक्षाची चाचणी घेण्यात आली. यावेळी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. 

यावेळी नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे, चंद्रकांत माने, आरटीओ पनवेल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजय कराळे, संजय पाटील, डीवायएसपी कर्जत, पीसीबी सागर किल्लेदार, आर. एस. कामत, प्रभारी पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि ई रिक्षाचे याचिकाकर्ते सुनील शिंदे आणि नागरिक मोठ्या संख्येने ई रिक्षाच्या स्वागतासाठी दस्तुरी नाक्यावर उपस्थित होते.चाचणीसाठी एकूण पाच कंपन्यांच्या ई रिक्षा दाखल झाल्या होत्या. सध्यातरी तीन महिने या रिक्षांचे परीक्षण घेण्यात आल्यानंतर तसा अभिप्राय संनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासक भणगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. रिक्षांमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. आम्ही या चाचणीच्या सुरक्षेसाठी आलो असून, चढउतार असणाऱ्या ठिकाणी रिक्षा कशा प्रकारे तग धरू शकते, याची सविस्तर माहिती वरिष्ठांना लवकरच देणार आहोत, असे माने यांनी सांगितले.

कामगार, रुग्णांसाठी सेवा फायदेशीरसर्व प्रक्रियेसाठी १० वर्षांपासून अविरतपणे पाठपुरावा करून रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार आणि अन्य सदस्यांच्या सोबतीने यशस्वीरीत्या या ई रिक्षाच्या चाचणीपर्यंत मजल मारणारे याचिकाकर्ते सुनील शिंदे यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे. या रिक्षांचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळींना घेता येणार आहे. दूरवर राहणारे बंगल्यांचे माळी, कामगारांना तसेच रुग्णांना ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाMatheranमाथेरान