शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ई-मेल म्हंजी काय रे भाऊ? ठाणे जि.प. सदस्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 03:01 IST

जिल्हा परिषदेच्या सदस्यांना लॅपटॉप देण्याचा ३८ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर झाला असला, तरी जि.प.च्या ५३ सदस्यांपैकी ३८ सदस्यांना त्यांचा ई-मेल आहे का, अशी विचारणा केली असता ३२ सदस्यांनी चक्क नकार दिला.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्हा परिषदेच्या सदस्यांना लॅपटॉप देण्याचा ३८ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर झाला असला, तरी जि.प.च्या ५३ सदस्यांपैकी ३८ सदस्यांना त्यांचा ई-मेल आहे का, अशी विचारणा केली असता ३२ सदस्यांनी चक्क नकार दिला. फारच थोड्या सदस्यांना फेसबुक माहीत असून टिष्ट्वटर तर अनेकांच्या गावीच नाही. ई-मेल म्हणजे काय, हे केवळ सहा पुरुष आणि एक महिला सदस्याला सांगता आले. त्यामुळे अशा सदस्यांना लॅपटॉप दिले, तर त्यापैकी किती सदस्य तो वापरतील व किती सदस्यांकडे तो धूळखात पडून राहील, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या सदस्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय झाल्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने ३८ सदस्यांना दूरध्वनी करून चार प्रश्न विचारले. तुमचा ई-मेल आयडी आहे का, तुम्ही स्वत: फेसबुक वापरता का, तुमचे टिष्ट्वटर अकाउंट आहे का आणि बाजारात लॅपटॉप कोणकोणत्या कंपन्यांचे आहेत आणि त्यापैकी तुमच्या पसंतीचा लॅपटॉप कोणता? केवळ सहा सदस्यांना ई-मेल, फेसबुक यांची कल्पना आहे.बहुतांश सदस्य ई-मेल आयडीबाबत अनभिज्ञ आहेत. काहींना ई-मेलची जुजबी माहिती असल्याचे लक्षात आले. मात्र, ज्यांनी ई-मेल ठाऊक असल्याचे सांगितले, त्यांच्याकडे त्यांचा ई-मेल मागितला असताना त्यांना तो आठवलाच नाही. काही सदस्यांनी फेसबुकबाबत ऐकले आहे. मात्र, टिष्ट्वटरपासून तर ते कोसो मैल दूर असल्याचे जाणवले. काहींनी तर आपण या भानगडीत पडत नाही, असे सांगितले. साध्या-सरळ लोकांमधून निवडून आलेलो आपण सदस्य आहोत. काहींनी ई-मेल आयडी तयार केला आहे, पण त्याचा आजपर्यंत वापर केला नाही, त्यामुळे तो त्यांना सांगताच येत नव्हता. काही सदस्यांनी आपल्याला यातील काही कळत नाही. मात्र, आमची मुलेमुलीच आमचे फेसबुक अपडेट करतात, असे कबूल केले.सदस्यांमधील बहुतांश जण व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. मात्र, ई-मेलचे त्यांना वावडे आहे. ई-मेल आयडी काय, अशी विचारणा केली असता काहींनी आपल्या जवळपास असलेल्या मुलामुलींकडे विचारणा केली. मुलामुलींनी सांगितलेला ई-मेल आयडी त्यांना प्रस्तुत प्रतिनिधीला धड सांगता येत नसल्यामुळे शेवटी त्यांनी मुलामुलींकडे मोबाइल दिला. ज्यांना त्यांचे असलेले किंवा नसलेले ई-मेल आयडी सांगण्याकरिता जवळपास घरातील व्यक्ती किंवा सहायक नव्हता, त्यांनी नंतर तुम्हाला पाठवतो, असे सांगून वेळ मारून नेली. प्रचाराचे, वाढदिवसाचे बॅनर लावण्यापूर्वी ते व्हॉट्सअ‍ॅपवर पाहतो, असे काही सदस्यांनी सांगितले. काहींनी आपण साधा फोन वापरत असल्याचे सांगितले. त्यामुळे फेसबुक, टिष्ट्वटरबाबत विचारण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही.सर्वाधिक महिला सदस्य जिल्हा परिषदेत आहेत. त्यातील मोजक्याच महिलांना ई-मेल, फेसबुकची माहिती आहे. पण, त्या त्याचा वापर करत नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाधिक महिला सदस्यांनी त्यांच्या पतीकडे मोबाइल देत, हे बघा काय विचारत आहेत, असा पवित्रा घेतला. महिला सदस्यांपैकी केवळ एका महिलेला नीट उत्तरे देता आली. त्यांनी आपण फेसबुकवर आहोत, मात्र टिष्ट्वट करत नाही, असे सांगितले. ई-मेल आहे, पण वापरत नाही, असे सांगत स्वत:चा ई-मेल आयडी सांगितला. लॅपटॉपचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची नावे सांगितली. काही महिला सदस्यांनी ई-मेल आयडी म्हणजे काय, अशी विचारणा केली.घरात आता नवरा किंवा मुलगा नाही. ते बाहेर गेले आहेत. ते घरी आल्यावर फोन करा, म्हणजे तेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, असे काही महिला सदस्यांनी सांगितले. मोबाइलवर फोन करणे आणि आलेला फोन उचलणे, एवढेच आपल्याला ठाऊक असल्याची कबुली काही सदस्यांनी दिली. काही महिला सदस्यांकडे तर मोबाइलच नाही. त्यांचा जनसंपर्क पतीच्या मोबाइलवरून होत असल्याचे दिसून आले.38 लाखांचा खर्च वाया जाण्याची शक्यताजिल्हा परिषद सदस्यांची ई-साक्षरता लक्षात घेता, बहुतांश पुरुष व महिला सदस्यांना दिलेले लॅपटॉप एकतर धूळखात पडतील किंवा त्यांची मुले वापरतील. त्यामुळे त्यावरील ३८ लाखांचा खर्च हा वाया जाण्याची शक्यता अधिक आहे.सदस्यांना अगोदर ई-मेल आयडी काढून देणे, जि.प.चे सर्व संदेश त्यावर पाठवून ते वापरण्यास भाग पाडणे, फेसबुक व टिष्ट्वटरच्या वापराचे प्रशिक्षण देणे, हे केल्यावर लॅपटॉप देणे उचित ठरणार आहे.मात्र, एखादी कंपनी आपले लॅपटॉप खपवण्यास उतावीळ झाली असल्याने व त्यामुळे काही अधिकाºयांचे खिसे गरम होणार असल्याने जर हा खटाटोप ठाणे जि.प. करत असेल, तर त्यातून काहीच साध्य होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :thaneठाणे