शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

महापौर विनीता राणे यांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:18 IST

डोंबिवली : शहरात शनिवारी होणाऱ्या श्रीनिवास मंगल महोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याचे निमंत्रक खासदार डॉ. श्रीकांत ...

डोंबिवली : शहरात शनिवारी होणाऱ्या श्रीनिवास मंगल महोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याचे निमंत्रक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार सुभाष भोईर यांनी शहरात ठिकठिकाणी महोत्सवाचे बॅनर लावले आहेत. मात्र, त्यात कल्याण-डोंबिवलीच्या प्रथम नागरिक महापौर विनीता राणे यांना डावलल्याची भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या निमित्ताने शोभायात्रा, पालखी काढण्यात येणार आहे. सकाळपासून विविध धार्मिक विधी होणार आहेत. क्रीडासंकुलामध्ये एक हजार भाविकांचा विवाह सोहळा, कुंकुमार्चन, महाप्रसाद, बालाजीचा विवाह सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यानिमित्ताने केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी शहरात ठिकठिकाणी पत्रके वाटण्यात आली आहेत. बॅनर, पोस्टर्स झळकत आहे. मात्र, त्यावर महापौरांचा उल्लेख नाही. महोत्सवाप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. असे असताना महापौर राणे यांना मात्र या महोत्सवापासून लांब ठेवल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.डोंबिवलीत आज वाहतुकीत बदलठाणे : सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगण डोंबिवली येथे १ डिसेंबरला श्रीनिवास मंगल महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमानिमित्त वाहतूक सुरळीत राहावी, म्हणून पोलीस उपआयुक्त वाहतूक अमित काळे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करून सकाळी ६ वाजेपासून कल्याणफाटा, शीळ रोडमार्गे डोंबिवली स्थानकाकडे तसेच रिजन्सी अनंतम व विकोनाका येथून डावीकडे जाणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

बंदी घातलेल्या वाहनांना (या जड-अवजड वाहने वगळून) कल्याण-शीळ रोडने मानपाडा पोलीस स्टेशन-टाटानाका येथून डावीकडे खंबाळपाड्याकडे वळून जाता येईल. तसेच कल्याण-शीळमार्गे डोंबिवली स्थानकाकडे जाणारी वाहने मानपाडा सर्कल येथूनच डावीकडे डोंबिवलीत वळतील व ती स्टार कॉलनीमार्गे जातील.

खारेगाव टोलनाका, मुंब्रा बायपास, शीळफाट्यापासून नवी मुंबईकडे जाणाºया वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी आहे. याठिकाणी येणारी वाहने कापूरबावडी उड्डाणपूल- कॅडबरी जंक्शन-आनंदनगर चेकनाका-मुलुंड-ऐरोलीमार्गे जातील. लागू केलेली ही अधिसूचना रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहील.