शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

मतमोजणीदरम्यान कल्याण-भिवंडीत वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:52 IST

डोंबिवलीत वाहतुकीत केला बदल । पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाने केले आवाहन

ठाणे/डोंबिवली/भिवंडी : ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघांच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान ठाणे सोडले, तर कल्याण आणि भिवंडीत मतमोजणीकेंद्रांच्या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाने खबरदारी घेऊन त्यात्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली असून याच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहनचालकांना केले आहे.

ठाणे मतदारसंघाची मतमोजणी ही न्यू होरीझॉन स्कूल, घोडबंदर रोड, कावेसर येथे होणार आहे. ही शाळा घोडबंदर रोड या मुख्य रस्त्यापासून आतमधील बाजूला आहे. त्यामुळे या तेथे कोंडी होणार नसल्याने वाहतूकबदल केलेला नाही. दुसरीकडे कल्याण मतदारसंघाची मतमोजणी डोंबिवली पूर्वेतील क्रीडासंकुलातील सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात होणार आहे. मतमोजणीवेळी क्रीडासंकुलाबाहेरील कल्याण रोड आणि घरडा सर्कलकडे जाणारे दोन्ही बाजूकडील रस्ते बंद राहणार आहेत. मात्र, सावित्रीबाई फुले कलामंदिरासमोरील रस्ता वाहतुकीस खुला असेल. त्यामुळे डोंबिवली स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना फुले कलामंदिराला वळसा घालून पेंढरकर महाविद्यालयाकडून जाता येईल. अन्यथा, ठाकुर्लीतील हनुमान मंदिराच्या बाजूकडील रस्त्यानेही जाता येईल. मात्र, हा रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

भिवंडी-कल्याण जॅम?भिवंडी मतदारसंघाची मतमोजणी प्रेसिडेन्सी स्कूल, एलकुंदे भिवंडी येथे होणार आहे. या ठिकाणी जरी वाहतुकीत बदल केला नसला, तरी येथे कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाºया मुंबई-नाशिक मार्गावरील राजनोलीनाका येथे भिवंडी-कल्याण आणि भिवंडी-ठाणे मार्गावर वाहतूककोंडीचे चित्र राहील, असा अंदाज आहे.वाहनचालकांनी या मार्गांवरून जाताना, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.