शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नोटाबंदीच्या काळात पालिकेत भ्रष्टाचार

By admin | Updated: January 14, 2017 06:23 IST

नोटाबंदीनंतर मीरा-भार्इंदर पालिकेने करवसुलीसाठी जमा केलेल्या शंभर, पन्नासच्या नोटा सत्ताधाऱ्यांतील एका नेत्याचे काळे धन

भार्इंदर : नोटाबंदीनंतर मीरा-भार्इंदर पालिकेने करवसुलीसाठी जमा केलेल्या शंभर, पन्नासच्या नोटा सत्ताधाऱ्यांतील एका नेत्याचे काळे धन पांढरे करण्यासाठी वापरल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेने रद्द झालेल्या नोटा कराच्या माध्यमातून वसूल केल्या. त्याचा उपयोग विकासकामांसाठी होणे अपेक्षित असताना करातून जमा झालेल्या शंभर, पन्नासच्या नोटा एका स्थानिक नेत्याचे काळे धन पांढरे करण्यासाठी वापरण्यात आल्या. त्याबदल्यात त्या नेत्याकडील जुन्या नोटा जमा करून घेण्यात आल्या. प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. ज्यांचे बांधकाम अधिकृत आहे, त्यांची खोटी कागदपत्रे तयार करून ती बांधकामे पाडली जात आहेत. फेरीवाल्यांकडून आर्थिक तडजोड करून त्यांना रस्त्यावर बसण्याची परवानगी दिली जात आहे. हा भ्रष्टाचार नोटाबंदीच्या काळात घडला आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. मीरा-भार्इंदर (शहर) जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने त्याचे निवेदन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना देण्यात आले. उपायुक्तांनी मात्र करवसुलीतील कोणत्याही नोटा बाहेर गेल्या नसल्याचे स्पष्ट करून बेकायदा कामांप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रभारी निरीक्षक यशवंत हापे, माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेते जुबेर इनामदार, प्रभाग सभापती प्रमोद सामंत यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)