शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

उल्हासनगरातील डंपिंग ग्राउंडची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, आयुक्त कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 18:09 IST

महापालिकेकडे डंपिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा नसल्याने पालिका आयुक्त व सत्ताधारी शिवसेना यांची कोंडी झाली आहे. 

उल्हासनगर : शहरातील डंपिंग ग्राउंड हटविण्याच्या मागणीची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन १ सप्टेंबर पूर्वी निर्णय घेण्याचे महापालिका आयुक्तांना सुचविले आहे. महापालिकेकडे डंपिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा नसल्याने पालिका आयुक्त व सत्ताधारी शिवसेना यांची कोंडी झाली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डंपिंग हटविण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी करून ३ सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला. नगरसेवकांच्या मागणीला आमदार कुमार आयलानी यांनी पाठिंबा देवून जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी यांनी आमदार आयालानी यांच्या मागणीची व उपोषणाला पाठिंबा देण्याची दखल घेऊन महापालिका आयुक्तांना पत्र दिले. अवैध डंपिंग ग्राउंड हटविण्याचा उल्लेख पत्रात केला. महापालिकेकडे डंपिंग ग्राउंड साठी पर्यायी जागा नसल्याने शहरातील कचरा कुठे टाकावा. असा प्रश्न महापालिका समोर उभा ठाकला आहे. म्हारळ गाव शेजारील राणा खादान येथील डंपिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्याने डंपिंग तात्पुरत्या स्वरूपात खडी मशीन खदान येथे हलविली. दरम्यान हेही डंपिंग ओव्हरफ्लो झाले आहे. 

शहारा शेजारील उसाटणे गावा हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकराची जागा महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विनामूल्य मागितली आहे. आमदार बालाजी किणीकर यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी उसाटणे गावा जवळील जागेची मागणी केल्यावर शासनाने जागा देण्याला तात्विक मंजुरी दिली. खडी खदान येथील डंपिंग ग्राउंड हटविल्यास महापालिकेकडे डंपिंगसाठी पर्यायी जागा नसल्याने महापालिका तसेच सत्ताधारी शिवसेना यांची कोंडी केली आहे. आज जिल्हाधिकारी ठाणे यांनी 1 सप्टेंबर पूर्वी डंपिंग ग्राउंडचा प्रश्न सोडण्यासाठीचे आदेश महापालिका आयुक्त उल्हासनगर महानगरपलिका यांना देण्यात आलेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप

देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

"आमच्यावर हल्ला कराल तर..."; छोट्याशा शेजारी देशाचा चीनला थेट इशारा

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! अचानक लोक झाले गायब, 'या' गावातील 90 टक्के घरांना टाळं

"मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरdumpingकचरा