शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यातील अपयश झाकण्यासाठी १४ गावातील भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:25 IST

मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप.

ठळक मुद्देमनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

कल्याण-दिव्यातील कचरा डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात यावे ही मागणी अनेक वर्षापासून आहे. मात्र हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी ते १४ गावातील भंडार्ली गावानजीक उभारण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला आहे. दिव्यातील अपयश झाकण्यासाठी भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड केले जात असल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कचऱ्याचे आंदोलन अधिक आक्रमक होईल. भंडार्ली गावात डंपिंग आणले तर अधिकारी आणि नेत्यांना कच:यात टाकू. नागरीकांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार केसेस करण्याची धमकी दाखवून डंपिंग लादले जात असेल तर आमच्यावर केसस झाल्या तरी चालतील मात्र डंपिंग होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा मनसे आमदार पाटील यांनी दिला.

ठाणे महापालिका हद्दीतील कचरा १४ गावातील भंडार्ली गावात टाकण्यासाठी चार हेक्टर जागा भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव संघर्ष समितीने विरोध केला आहे. १४ गावात आधीच प्रदूषणाची समस्या आहे. ठाणे महापालिका जबरदस्तीने शहरातील कचरा गावातील नागरीकांच्या माथी मारुन त्यांचे आरोग्य धोक्यात आणत असल्याची बाब संघर्ष समितीने नमूद केली आहे. बुधवारी १४ गाव संघर्ष समिती समितीची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार पाटील हे उपस्थित होते. आमदारांनी डंपिंगला विरोध करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक डोळ्य़ासमोर ठेवून राजकारण केले जात आहे. यावेळी आमदार पाटील यांनी भंगार माफियांनाही दम भरला आहे. सत्ताधाऱ्यांना कचऱ्यातून निवडणूकीचा फंड जमा करायचा आहे का असा सवालही उपस्थित केला आहे.

१०० एकर जागा महापालिकेनं घेतलीमलंग गड हा सह्याद्रीच्या फूटहिल्स समजला जातो. या फूटहिल्सपासूनच सह्याद्रीच्या पर्वत रांगांची सुरुवात होते. मलंग गडाच्या पायथ्याशी करवले गावात मुंबई महापालिकेने १०० एकर जागा घेतली आहे. त्याठिकाणी डंपिंग ग्राऊंड कचरा प्रकल्प तयार केला जाणार आहे. करवले गावा शेजारी असलेल्या उसाटणे गावानजीक १० हेक्टर जागेवर कचरा प्रकल्प उभारण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रयत्नशील आहे. करवले आणि उसाटणे गावातील दोन्ही डंपिंग ग्राऊंडला विरोध असताना आत्ता ठाणे महापालिका हद्दीतील कचरा भंडार्ली गावातील नागरीकांच्या माथी मारुन त्यांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. एकूण निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावात डंपिंग तयार करुन गावे बकाल आणि प्रदूषित करण्याचा घाट घातला जात असल्याने त्याला विरोध केला जाईल अशी या गावातील नागरीकांची भूमिका आहे.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटीलdumpingकचरा