शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या जागेवर डम्पिंग

By admin | Updated: April 9, 2016 03:39 IST

शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत असताना अखेर शीळ येथील वन विभागाच्या अखत्यारीतील बंद पडलेल्या खदाणीची जागा महापालिकेला डम्पिंगसाठी उपलब्ध झाली आहे.

ठाणे : शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत असताना अखेर शीळ येथील वन विभागाच्या अखत्यारीतील बंद पडलेल्या खदाणीची जागा महापालिकेला डम्पिंगसाठी उपलब्ध झाली आहे. पर्यावरण विभागाने यास मान्यता दिली असून या ठिकाणी ४०० मे. टन ओल्या कचऱ्यावर अ‍ॅरोबिक कम्पोस्टिंग पद्धतीने खतनिर्मिती केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्यावर गेली असतानादेखील आजही ठाणे महापालिकेला हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळाले नव्हते. शहरात रोज ७०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून सध्या त्याची विल्हेवाट दिव्यातील क्षेपणभूमीवर लावली जात आहे. परंतु, डायघरचा प्रश्न स्थानिकांच्या विरोधामुळे आणि तळोजा येथील सामायिक भरावभूमीचा प्रस्ताव दरामध्ये आलेल्या तफावतीमुळे रखडल्याने पालिकेला अद्यापही शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लावता आलेली नाही. सध्या दिवा-खर्डी येथील जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. परंतु, येथील रहिवाशांचाही विरोध झाल्याने आणि उच्च न्यायालयानेदेखील डम्पिंगच्या मुद्यावरुन पालिकेची कानउघाडणी केल्याने अखेर पालिकेने हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. शीळ येथील वन विभागाची जागा मिळावी म्हणून पालिकेने वन विभागाशी वारंवार पत्रव्यवहारही केला होता. परंतु, त्यावर अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, पर्यावरण विभागाच्या अपर मुख्य सचिव मालिनी शंकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पर्यावरण परिणाम प्राधिकरणाने ही जागा पालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे.मौजे शीळ येथे वन खात्याच्या जमिनीवर अंदाजे अडीच एकर जागेत बंद पडलेली खदाण आहे. त्या ठिकाणी घनकचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले जाणार आहे. या जागेमध्ये शहरामध्ये संकलित होणाऱ्या जवळपास ४०० टन ओल्या कचऱ्यावर अ‍ॅरोबिक कम्पोस्टिंग पद्धतीने खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. याशिवाय, दिवा येथील उघड्यावर असलेले डम्पिंगदेखील आता बंद स्वरूपात कार्यरत केले जाणार आहे.