शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

डम्पिंग दोन वर्षांनंतर होणार बंद; केडीएमसी आयुक्तांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:52 IST

नगरविकास खात्याला पाठवला अहवाल

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची डोकेदुखी ठरलेले आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी आणखीन दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचा अहवाल आयुक्त गोविंद बोडके यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना पाठवला आहे. महापालिकेच्या या अहवालामुळे कल्याणच्या नागरिकांना डम्पिंगच्या त्रासातून सुटका होण्यासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.आधारवाडी डम्पिंग ग्राउंड व घनकचरा प्रकल्पांसंदर्भात ८ जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उंबर्डे घनकचरा प्रकल्प १५ सप्टेंबरपर्यंत व बारावे प्रकल्प १५ जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. अन्यथा, अधिकारीवर्गाचे पगार आणि महापालिकेस दिले जाणारे सरकारी अनुदान रोखण्याचा इशारा दिला होता. या आदेशानंतरही महापालिका प्रशासनाकडून डेडलाइन पाळली गेली नाही.यासंदर्भात नगरविकास खात्याकडून विचारणा केली असता आयुक्तांनी नगरविकास खात्याला एक अहवाल पाठवला आहे. त्यात उंबर्डे घनकचरा प्रकल्पाचे काम दिलेल्या डेडलाइनमध्ये पूर्ण होणार होते. मात्र, सुरू असलेल्या कामाला अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे विलंब झाला. पावसाचा जोर कमी झाल्याने प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.प्रकल्पाचे सध्याच्या स्थितीला ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम २५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करून प्रकल्पात कचरा प्रक्रिया ३१ आॅक्टोबरपासून सुरू केली जाईल, असे कळवले आहे. उंबर्डे प्रकल्प आॅक्टोबरपासून सुरू झाल्यावर ६५० मे.ट. कचऱ्यापैकी ३५० मे.ट. कचºयावर प्रक्रिया होईल.देवधर समितीचा अहवाल येताच कामाला होईल सुरुवातआधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी निविदा काढली आहे. मात्र, त्यापूर्वी उंबर्डे व बारावे प्रकल्प जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करता येत नाही. बारावे कचरा प्रकल्पाबाबत हरित लवादाकडे याचिका प्रलंबित आहे. लवादाने हे प्रकरण सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठविले आहे. नगरविकास खात्याने देवधर समितीची नियुक्ती केली आहे. प्रकल्पास नागरिकांचा विरोध आहे. देवधर समितीचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल प्राप्त होताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करता येईल.अहवाल प्राप्त झाल्यानंतर सहा महिन्यांत प्रकल्पाचे काम करणे शक्य होईल, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असल्याने पावसाळ्यानंतर पोलीस बंदोबस्तात प्रकल्पाचे काम केले जाईल. ही सगळी प्रक्रिया पाहता, आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.याशिवाय, मांडा येथील कचरा प्रकल्पाचे काम महापालिकेने राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीकडे सादर केले आहे. समितीने पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल मागितला होता. सुधारित अहवालही महापालिकेने १९ सप्टेंबर २०१९ रोजी सादर केला आहे. प्रकल्पास पर्यावरण नाहरकत दाखला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे मांडा येथील प्रकल्पाचे घोडे अडलेले आहे.

टॅग्स :dumpingकचरा