शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या स्टॉलवर पालिकेची गदा

By admin | Updated: January 25, 2016 01:18 IST

वसई-विरार शहर महानगरपालिका एकीकडे अपंगांसाठी कल्याणकारी योजना राबवत असताना दुसरीकडे पालिकेनेच पाच परवानाधारक अपंगांच्या रोजीरोटीवर

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका एकीकडे अपंगांसाठी कल्याणकारी योजना राबवत असताना दुसरीकडे पालिकेनेच पाच परवानाधारक अपंगांच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा प्रयत्न चालवल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. वसई पश्चिमेतील अभिलाषा रोडवर असलेल्या २२ स्टॉलवर पालिकेने कारवाई केली. विशेष म्हणजे या २२ स्टॉलमध्ये पाच अपंगांचे स्टॉल असून या स्टॉलना तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने परवानगी दिलेली आहे. अपंगांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी २००८ मध्ये तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने पाच अपंगांना वसई पश्चिमेतील साईनगर स्थित अभिलाषा रोडच्या बाजूला स्टॉलची परवानगी दिली होती. तर, अन्य १७ स्टॉलधारकांनीही परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केले होते. या ठिकाणी एकूण २२ स्टॉलच्या माध्यमातून अपंग व आर्थिक दुर्बल घटकांतील लोक किरकोळ सामानविक्री करून आपला उदरनिर्वाह करायचे. परंतु, एक महिन्यापूर्वी पालिकेच्या ‘एच’ प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुरेश पवार यांनी स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची सबब पुढे करून सर्व स्टॉलधारकांना स्टॉल हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर, परवानाधारक स्टॉलधारकांनी मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना वसई-नालासोपारा लिंक रोड किंवा १०० फुटी रोडवर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, या आश्वासनांची पूर्तता न करताच पालिकेने स्टॉल हटवण्याची कारवाई सुरू केल्याने स्टॉलधारकांनी त्यास तीव्र विरोध केला. (प्रतिनिधी)पालिका पर्यायी जागा उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत स्टॉल हटवणार नाही, अशी भूमिका अपंग स्टॉलधारक देवराज कपूर, ब्रिजेशकुमार चौबे, चंपकभाई शहा, रोहित रामदास आसर, बलजितसिंग गुलाटी व बाबुलाल चव्हाण यांनी घेतली आहे. अन्य स्टॉलधारकही मागील सात ते आठ वर्षांपासून पालिकेची दैनंदिन पावती फाडत असल्याचे सांगून पालिकेने आमचा रोजगार हिरावून घेतल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ ओढवणार असल्याचे सांगितले. या स्टॉलवर अनेकांची कुटुंबे अवलंबून आहेत, त्यामुळे पालिकेने या गरिबांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असे काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य महिला जनरल सेक्रेटरी सय्यद नजमा अस्लम व सय्यद मोहम्मद अस्लम यांनी सांगितले.वसईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध फेरीवाले बस्तान मांडून बसले आहेत. मुख्य रस्त्यांवर धनाढ्य गाड्या विक्रेत्यांकडून गाड्या उभ्या ठेवण्यासाठी रस्त्याचा वापर केला जातो. असे असतानाही पालिका त्याकडे काणाडोळा करून गरिबांच्या रोजीरोटीवर गदा आणत असल्याचा आरोप अस्लम यांनी केला आहे.