शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

हद्दीच्या वादात डॉल्फीनचा मृतदेह कुजवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 06:44 IST

वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर हालचाली सुरू : आठ दिवसांनी बाहेर काढला कुजलेला मासा

मीरा रोड : १८ एप्रिल रोजीच मुंबई व ठाण्यातील वनअधिकाऱ्यांना भाईंदर खाडीकिनारी मृत डॉल्फीन बोटीतून नेण्यात आल्याची कल्पना असताना, आपली हद्द नसल्याचे कारण पुढे करून डॉल्फीनचा वेळीच शोध घेण्यात आला नाही. हद्दीच्या वादातून एकमेकांकडे बोट दाखवत राहिल्याने घोडबंदर गावात दफन केलेला डॉल्फीन अखेर वरिष्ठांच्या आदेशानंतर गुरुवारी, आठ दिवसांनी बाहेर काढण्यात आला. वनविभागाच्या हद्दीच्या वादात डॉल्फीन मात्र नाहक सडवण्यात आला.१८ एप्रिल रोजी भाईंदर पश्चिमेच्या धक्क्यावर एका बोटीत ताज्या अवस्थेत असलेल्या मृत डॉल्फीनची छायाचित्रे लोकमतच्या हाती आल्यावर, त्याची माहिती मुंबईच्या कांदळवन सेलचे अधिकारी तसेच ठाण्याचे वनअधिकारी यांना देण्यात आली होती. दुसºया दिवशी, १९ एप्रिल रोजी लोकमतने डॉल्फीनचे वृत्तसुद्धा प्रकाशित केले होते. त्याआधी दोन दिवसांपूर्वी खाडीमध्ये वावरणारा डॉल्फीन काही मच्छीमारांना दिसून आला होता. त्यामुळे बोटीत असलेला मृत डॉल्फीन तोच असण्याची शक्यता होती; परंतु ठाणे वनअधिकाऱ्यांनी समुद्री जीवांसाठी कांदळवन सेल असून, मीरा-भार्इंदरचा भाग आमच्याकडे येत नसल्याचे सांगितले. मुंबईच्या कांदळवन सेलकडूनदेखील मीरा-भार्इंदरमधील कांदळवन आमच्याकडे हस्तांतरित झालेले नसल्याने ती आमची हद्द नसल्याचे सांगण्यात आले. या वादात डॉल्फीनचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न वनविभाग किंवा कांदळवन सेलने केला नाही. मृत डॉल्फीनसोबतची काही मुलांची घोडबंदर गावातील छायाचित्रे हाती लागल्यानंतर ती ठाणे आणि मुंबईच्या वनअधिकाºयांना पाठवण्यात आली. पण, त्यानंतरही अधिकाºयांनी आपली हद्द नसल्याचे तुणतुणे पुन्हा वाजवले.शेवटी, हा प्रकार ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना २४ एप्रिल रोजी सांगितल्यावर त्यांनी वनक्षेत्रपाल डी.सी. देशमुख व वनपाल संजय पवार यांना पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वनअधिकाºयांनी गुरुवारी छायाचित्रांच्या आधारे घोडबंदर गावात मुलांचा शोध घेतला. मुलांनी डॉल्फीन पुरलेली जागा दाखवली. वनअधिकाºयांनी डॉल्फीनला बाहेर काढले असता तो कुजला होता.समुद्री जीवांची कार्यवाही कांदळवन सेल करत असल्याने मुंबईच्या अधिकारी सीमा आडगावकर यांना कळवण्यात आले. पण, त्यांनी आपली हद्द नसल्याचे सांगून येण्यास नकार दिला. शेवटी, कांदळवन सेलचे प्रमुख वासुदेवन यांनी ही हद्द कांदळवन सेलची नसल्याचे रामगावकर यांना स्पष्ट केले. त्यानंतर शवविच्छेदन करुन डॉल्फीनवर अंत्यसंस्कार केले.डॉल्फीनचा मृत्यू कसा झाला, याचा अहवाल अजून आला नाही; मात्र १८ एप्रिल रोजीच त्याचा शोध घेतला असता, तर त्याचा मृतदेह चांगल्या स्थितीत आढळला असता. त्याच्या अंगावर जखमा अथवा जाळ्याच्या खुणा आहेत का, हे पाहता आले असते. सहसा डॉल्फीनचा मृतदेह इतक्या ताज्या अवस्थेत सापडत नसल्याने तो जतन करून ठेवता आला असता. पण, हद्दीच्या वादात डॉल्फीन नाहक सडवला गेला. आता सदर डॉल्फीन भाईंदरच्या धक्क्यावरून एका मच्छीमाराने दिल्याचे मुलांकडून सांगण्यात आल्याने त्याचा शोध सुरू आहे.डॉल्फीनची सुरक्षा आणि काळजी घेण्याची गरजडॉल्फीन हा दुर्मीळ आणि संरक्षित जातीतला मासा असून मनुष्याचा मित्र म्हणून ओळखला जातो. लहानांपासून मोठ्यांमध्ये डॉल्फीनला पाहण्याची क्रेझ असते. भाईंदरच्या खाडीत याआधी १२ सप्टेंबर २०१८ रोजी आरएनपी पार्क, कोळीवाड्याजवळ ताज्या अवस्थेतील मृत डॉल्फीन सापडला होता.त्याला पाहण्यास लहानमोठ्यांनी गर्दी केली होती. खाडीत पालिकेकडून सांडपाणी सोडले जाते. याशिवाय, मोठ्या प्रमाणात कचरा, निर्माल्य आदी खाडीत टाकले जात असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे.तसेच मच्छीमार मासे पकडण्यासाठी लांब जाळी लावतात. त्यामुळे भाईंदरच्या खाडीत येऊ लागलेल्या डॉल्फीनची काळजी घेण्यासह जनजागृतीची आवश्यकता असल्याचे एका वनअधिकाºयाकडून सांगण्यात आले.