शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कामगारांच्या पगारावर लिपीकाने मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 02:00 IST

भिवंडी : संगणकातील डाटामध्ये फरक करून महानगरपालिका कामगारांच्या पगारावर डल्ला मारणाऱ्या लिपीका विरोधात विधी अधिकाºयांनी पोलीसांत गुन्हा दाखल केला ...

ठळक मुद्देसंगणकातील डाटामध्ये फरक करून मारला डल्लाआर्थिक फायद्यासाठी १ लाख १० हजार ८७९ रूपयांचा अपहारआकाश बळीराम भोईर याच्या विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी: संगणकातील डाटामध्ये फरक करून महानगरपालिका कामगारांच्या पगारावर डल्ला मारणाऱ्या लिपीका विरोधात विधी अधिकाºयांनी पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यापासून असे प्रकार पालिकेच्या विविध प्रभागात झाल्याने कामगारांमध्ये भिती निर्माण झाली आहे.महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्र. ५ मध्ये काम करणारा लिपीक आकाश बाळाराम भोईर याने माहे एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान मंजूर देयकानुसौर कामगारांना वेतन न करता सदर रक्कमेचा संगणक डाटामध्ये फेरफार केला. त्याच प्रमाणे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी १ लाख १० हजार ८७९ रूपये स्वत:च्या खात्यात जमा करून घेऊन या रक्कमेचा अपहार केल्याचे आढळून आले. त्याने महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान करून फसवणऊक केल्या प्रकरणी मनपाचे विधी अधिकारी अनिल प्रधान यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात आकाश बळीराम भोईर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.गेल्या महिन्यात आस्थापना विभागात काम करणाºया दोन कर्मचा-यांनी महानगरपालिकेच्या कामगारांच्या वेतनपत्रकात फेरफार करून सुमारे दिड लाख रूपयांचा अपहार करून पालिकेचे व कामगारांचे आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर सहा महिन्यापुर्वी प्रभाग समिती क्र. ४ मध्ये सुध्दा संगणाकांत फेरफार करून नागरिकांनी भरलेल्या कराच्या रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या १ ते ५ प्रभााग समिती कार्यालयांत मालमत्ता कराचा कपशील असलेल्या संगणकाचे सखोल तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी