शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरडीसह माती, झाडे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:24 IST

कसारा घाटासह महामार्गावरील दुरावस्थेकडे अनेक वर्षा पासून दुर्लक्ष करीत असून महामार्ग वरील रस्ते दुरुस्ती, कसारा घाटातील दरडी वर उपाययोजना  करण्यास दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत.

- शाम धुमाळ 

कसारा :  मंगळवारी  रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई नाशिक महामार्ग काही प्रमाणात विस्कळीत झाला तर कसारा घाटात काही ठिकाणी झाडेे, काही ठिकाणी दरडी सह मातीचे ढिगारे  रस्त्यावर कोसळले. परिणामी या मुळे मुंबईहुन नाशिककडे जाणारी वाहतूक तुरळक ठप्प झाली.   मुंबई ठाणेसह सर्वत्र पावसाचे प्रमाण जास्त असताना काल रात्री पासून शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रासह परिसरात मोठया प्रमाणात पावसाने जोर पकडला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची शेती कामे जोरात सुरु झाली आहेत. मात्र, या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्ग विस्कळीत होत असल्याचे दिसून आले. मुंबईहुन नाशिककडे जाताना भिवंडी ते गोंदे (इगतपुरी )या दरम्यान महामार्गवर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे व काही ठिकाणी पाणी  साचले असल्यामुळे मुंबई नाशिक व नाशिक मुंबई या दोन्ही लेन वर वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. तर कसारा घाटात ठीक ठिकाणी दरडी, माती, झाडें उन्मळून पडल्याने प्रवाशाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कसारा घाटातील दोन्ही लेन या धोकादायक स्तिथीत असल्यामुळे घाटातून प्रवास करणे प्रवाश्याना  जिकरिचे ठरत आहे.

पीक इन्फ्रा  व  NHI चे  दुर्लक्ष.... दरम्यान कसारा घाटासह महामार्गावरील दुरावस्थेकडे अनेक वर्षा पासून दुर्लक्ष करीत असून महामार्ग वरील रस्ते दुरुस्ती, कसारा घाटातील दरडी वर उपाययोजना  करण्यास दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी भरमसाठ टोल भरून देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोकयावर टांगती तलवार ठेऊन प्रवास करावा लागत आहे. 

टॅग्स :Rainपाऊस