शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सोयी-सुविधा नसल्याने धरली गुजरातची वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 07:55 IST

कामगारांचे प्रश्नही कमी असल्याने गेल्या दशकभरात अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला टाटा केला आहे.  

- वसंत भोईरवाडा : वारंवार मागणी करूनही वाडा तालुक्यातील उद्योगांना सरकारने सोयी-सुविधा न पुरवल्याने अनेक उद्योगांनी गाशा गुंडाळला असून ते गुजरात, वापी, दीव, दमणला स्थलांतरित झाले आहेत. याचा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला फटका बसला, तसेच स्थानिक कामगारही बेरोजगार झाले आहेत.  

एकेकाळी भरभराटीला आलेल्या वाड्याच्या औद्योगिक क्षेत्राला कामगारांच्या समस्यांनी ग्रासले आहे. खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, महागडी वीज या समस्या सुटत नसल्यानेही काही उद्योगांनी वारंवार दाद मागितली; पण त्यावर तोडगा निघाला नाही. उलट गुजरात आणि त्याला लागून असलेल्या परिसरात तुलनेने वीज स्वस्त आहे. रस्तेही चांगले आहेत. कामगारांचे प्रश्नही कमी असल्याने गेल्या दशकभरात अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला टाटा केला आहे.  

हजारो कारखाने असूनही साधी अग्निशमन दलाची सोय नाही. एखाद्या कंपनीला आग लागली, तर त्यातील कोट्यवधींची साधनसामग्री जळत असल्याचे पाहण्यावाचून पर्याय उरत नाही. वाडा तालुका हा पालघर, भिवंडी येथील दोन खासदार आणि भिवंडी ग्रामीण, शहापूर व विक्रमगड या तीन आमदारांच्या कार्यक्षेत्रात विभागलेला आहे. त्यामुळे कोणत्याही एका लोकप्रतिनिधीचे या तालुक्याकडे लक्ष नाही. त्याचा फटका येथील विकासकामांना बसतो. 

तालुक्याच्या दुर्गम भागात अजूनही रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचू शकलेले नाही. कोणत्याही निवडणुकांच्या काळात तोंड भरून आश्वासने दिली जातात. मात्र, नंतर काहीच पदरी पडत नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे. पूर्वी हा मतदारसंघ डहाणू होता. आताच्या पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने ३० वर्षे, भाजपने पंधरा वर्षे, तर शिवसेनेने पाच वर्षे सत्ता उपभोगली. मात्र, या तिन्ही पक्षांना ठोस विकास करता आलेला नाही.

सिंचनाची समस्या,  कारखानेही नाहीतवाडा तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. भाताच्या एकमेव पिकावरच अवलंबून राहावे लागते.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे भाजीपाला, कडधान्य, फुलशेती करतात. तानसा, वैतरणा, पिंजर, गारगाई, देहर्जे  या ५ बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यावर म्हणावे तेवढे बंधारे नसल्याने सिंचनाची समस्या कायम आहे.शेतीवर प्रक्रिया करणारा कारखाना न आल्याने वेगळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांपुढे बाजारपेठे शोधण्याचे आव्हानही उभे ठाकते.

टॅग्स :palgharपालघर