शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात व्यापारी व फेरीवाले आमने सामने; आमदार आयलानी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

By सदानंद नाईक | Updated: October 18, 2022 18:10 IST

उल्हासनगरातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्यातील वादामुळे आमदार आयलानीनी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

उल्हासनगर : दिवाळी सणानिमित्त नेहरू चौक परिसरातील गजानन व जपानी कपडे मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. खरेदीच्या निमित्ताने स्थानिक व्यापारी व फेरीवाले आमनेसामने आले असून त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी आमदार आयलानी यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उल्हासनगर कॅम्प नं-२ मधील नेहरू चौक ते शिरू चौक दरम्यान मार्केट मध्ये नागरिकांनी दिवाळी खरेदीसाठी एकच गर्दी केली. नागरिकांची गर्दी लक्षात घेवून वाहतूक पोलिसांनी मोठया गाड्यांना जाण्या-येण्यास बंदी केली. 

या गर्दीतून नागरिकांनाही जाता येत नाही. गर्दीचा फायदा उठविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला फेरीवाल्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली. मंगळवारी गोलमैदान नेहरू चौक परिसरात आठवडी बाजार भरत असल्याने, गर्दीचा उंचाक निर्माण झाला. वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. तसेच महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले. दरम्यान फेरीवाले व स्थानिक व्यापारी आमनेसामने आल्याने, ऐन दिवाळीत अनर्थ होऊ नये म्हणून व्यापारी संघटनेचे दिपक छतवाणी यांनी पुढाकार घेऊन आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी व्यापारी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

आमदार कुमार आयलानी यांनी घेतलेल्या बैठकीला व्यापारी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपक छतवानी, सहायक आयुक्त अजित गोवारी, तुषार सोनावणे, स्थानिक व्यापारी आदीजन उपस्थित होते. आमदार आयलानी यांनी दोन्ही बाजू एकून मध्यस्थ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच महापालिका सहायक आयुक्त तुषार सोनावणे व अजित गोवारी यांना यावर तोडगा काढण्याचे सांगितले. दिवाळी सण व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी मोटरसायकली व इतर वाहने आणण्यास टाळावे. असा निर्णय घेण्यात आला. तसेच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करून उत्तम सेवा देण्याचे आयलानी व छतवानी यांनी व्यापाऱ्यांना सांगितले.

फटाक्यांची दुकाने रात्र-दिवस सुरू नेहरू चौक परिसरात हजारोच्या संख्येने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. याच ठिकाणी फटाक्याची दुकाने असून कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता, फटाक्यांची विक्री होत आहे. यामध्ये महापालिकेने बंदी केलेल्या १२५ डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके आहेत. रात्रभर फाटक्याचे दुकाने सुरू असल्याचे चित्र असून महापालिका प्रशासन व पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरMLAआमदारDiwaliदिवाळी 2022