शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी.. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी.. 

By अजित मांडके | Updated: June 28, 2023 15:25 IST

सकाळच्या सुमारास नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र दाणादाण उडालेली पाहायला मिळाली आहे.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यात यंदाच्या वर्षीही नालेसफाई आणि गटार सफाईची पोल खोल पावसाने केली आहे. ४ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील विविध परिसरात पाणी भरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ठाण्यातील वंदना सिनेमा परिसर, खारकराळी परिसर, जांभळी नाका परिसर, केसरमिल, कळवा पूर्व, मुंब्रा, दिवा या ठिकाणी सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र दाणादाण उडालेली पाहायला मिळाली आहे.

सकाळच्या सुमारास तारेवरची कसरत करून चाकरमान्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर या साचलेल्या पाण्यामुळे ठाण्यात ठीक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. संत गतीने सुरु असलेल्या पाण्यामुळे शहरातील घोडबंदर रोड, ठाणे वागळे इस्टेट, ठाणे मुंबईला जोडणारे टोळ नाका तसेच माजिवडा येथील भिवंडी दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे.

ठाण्यात पावसाचा जोर कायम..

ठाण्यात पावसाचा जोर वाढला असून दिवसभरात 105.16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे...मुसळधार पावसाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळ रुळावर काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरवात झाली असली तरी रेल्वे सेवा सुरुळीत सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीय..रेल्वे यंत्रणा एलर्ट मोडवर आली असून पाणी जास्त वढल्यास सक्षन पंप द्वारे पाणी उपसा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहितीही देण्यात आलीय..

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस