शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

चोरीमुळे पाणीकपातीत वाढ; महिनाभरानंतर पुन्हा घेणार ‘पाणीबंद’चा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:34 IST

जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही. पाणीचोरीच्या या गोरखधंद्यामुळेच नागरिकांवर प्रत्येक आठवड्याला पाणीकपातीचा प्रसंग ओढवल्याचे उघड झाले आहे.काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तरीही पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणासह आंध्रा धरणातून होणाºया पाणीपुरवठ्यात सुमारे सात टक्के म्हणजे ५४ दशलक्ष घनमीटर पाण्याची वार्षिक तूट उघडकीस आली. ती भरून काढण्यासाठी जानेवारीपासूनच १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात लागू केली. मात्र, तरीही पाण्याची चोरी सुरूच राहिली. यामुळे ही कपात वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. १९ मार्चपासून ही कपात लागू केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी महापालिका आता सोयीनुसार करणार आहेत. जादा पाणी उचलण्यातील मनमानी, पाण्याची चोरी याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी बातम्या दिल्या होत्या. पण त्यावर अंकुश न ठेवल्याचे परिणाम लाखो नागरिकांना भोगावे लागत आहेत.पालिकांसह पाणी उचलणाºया संस्थांनी मंजूर कोट्यानुसार पाणी उचलल्यास पाणीकपातीची गरज भासणार नाही. परंतु प्रत्येक पालिकेत ३५ ते ४० टक्के पाणीगळती, चोरी असून ती रोखली जात नाही. काही पालिकांत तर ग्ही गळती-चोरी मोजण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे पालिका गरजेपेक्षा जास्त पाणी उचलतात. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्याने सध्या महिन्यातून दोन दिवस कपात होती. ती वाढवून चार दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरानंतर पाणीसाठ्याचा आढावा ही कपात कायम ठेवायची की नाही, ते ठरवले जाईल, असे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार यांनी सांगितले.उल्हास नदी व बारवी धरणातून ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आदी शहरांना पाणीपुरवठा होतो. यंदा त्यांची पाणीटंचाईतून मुक्तता होईल, असे वाटेत होते. पण, प्रत्येक यंत्रणेने जादा पाणी उचलल्याने चोरी होत असल्याचे जानेवारीतील सर्वेक्षणातून निदर्शनात आले. जनसेवेसाठी पाणीचोरी करत असल्याचे सांगून महापालिका त्यांच्या मनमानीवर पडदा टाकत आहेत. त्याचे परिणाम नागरिकांना आता भोगावे लागत आहेत. त्यांना चार दिवस त्याची झळ सोसावी लागेल.- मंजूर पाणीकोट्यापेक्षा कधीकाळी पाच ते दहा टक्के जादा पाणी उचलण्यास हरकत नाही. पण, या सवलतीचा गैरफायदा सक्तीच्या कालावधीतही सुरूच ठेवल्यामुळे पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. लघुपाटबंधारे विभागाच्या याआधीच्या अहवालानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका त्यांच्या मंजूर पाणीकोट्यापेक्षा ३० टक्के जादा पाणी उचलत आहे.तर, एमआयडीसीही सर्वाधिक म्हणजे ३५ टक्के जादा पाण्याची चोरी-उचल करत असल्याचे निदर्शनास आले. याप्रमाणेच टेमघर, एमजेपी, आदी संस्था सुमारे पाच-दहा टक्के जादा पाणी उचलत असल्याची निरीक्षण लघुपाटबंधारे विभागाने नोंदवलेले आहे.कल्याण-डोंबिवली २३४ दशलक्ष लीटर (एमएलडी) मंजूर पाणीपुरवठ्याऐवजी दिवसाला ३१० एमएलडी म्हणजे ३० टक्के जादा पाणी रोज उचलत आहे. याप्रमाणेच एमआयडीसीदेखील ५८३ एमएलडीऐवजी रोज सर्वाधिक ७८० एमएलडी पाण्याची चोरी करत असल्याचे चौकशीअंती उघड झाले.ठाण्याच्या काही भागांसह भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणाºया टेमघरला रोज २८५ एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी आहे. पण, तेही ३०० एमएलडी म्हणजे सरासरी १० टक्के जादा पाणीउचलत आहेत. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिकांना पाणीपुरवठा करणारी एमजेपी ९० एमएलडीऐवजी १०० एमएलडी म्हणजे १० टक्के जादा पाणी उचलत असल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :Waterपाणी