शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सामाजिक दायित्वामुळे १० रुपयांत जेवण शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 23:09 IST

दात्यांनी पुढे येण्याची गरज । अंबरनाथ-बदलापुरातील उपक्रम

पंकज पाटील

बदलापूर / अंबरनाथ : भुकेल्याला अन्न देणे हे पुण्याचे काम मानले जाते. त्यामुळेच अंबरनाथ आणि बदलापुरात वेगवेगळ्या संकल्पनांतून दोन ठिकाणी १० रुपयांत जेवण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात, चांगले जेवण १० रुपयांत देणे हे आर्थिकदृृष्ट्या अवघड असले तरी ही तारेवरची कसरत संयोजकांनी यशस्वीरीत्या सुरू केली आहे.

राज्यात शिवसेनेने १० रुपयांत, तर भाजपने ५ रुपयांत पोटभर जेवण देण्याची सवंग घोषणा निवडणुकीपूर्वी केली असली, तरी त्याआधीच अंबरनाथ-बदलापुरात सामाजिक बांधीलकीतून जेवणाच्या दर्जात तडजोड न करता १० रुपयांत जेवण देणे शक्य करून दाखविले आहे. अंबरनाथमध्ये गावदेवी चौकात १० रुपयांत जेवण देण्याची संकल्पना शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी राबवली आहे. दररोज दुपारी ३०० जणांच्या जेवणाची सोय केली जात आहे. ते देत असताना त्याचा दर्जा सांभाळला जात आहे. तो चांगला ठेवण्यासाठी स्वत: वाळेकर आणि त्यांचे कुटुंबीय लक्ष देत आहेत.बदलापुरात कॅप्टन आशीष दामले यांनी ताईज् किचन नावाने १० रुपयांत जेवण देण्याचा उपक्रम राबविला. या ठिकाणी दुपारी २५० ते सायंकाळी १५० जणांना जेवण देण्यात येते. दररोज सरासरी ३५० ते ४०० नागरिक या ठिकाणी १० रुपयांत जेवण करतात. मात्र, ते करण्यासाठी दामले यांना एका वर्षाचे नियोजन आधीच करून ठेवावे लागत आहे. जेवणासाठी लागणारा भाजीपाला हा थेट जुन्नरहून मागविण्यात येतो. त्यामुळे भाजी स्वस्त मिळते, तर कडधान्य हे होलसेल मार्केटमधून आधीच भरून ठेवलेले असते. ते खरेदी करत असताना मार्केटमधील व्यापारीही आपला नफा बाजूला ठेवून कडधान्य विकतात. भाजी आणि कडधान्य या दोन वस्तू मदतीच्या स्वरूपात मिळविण्याचा प्रयत्न दामले यांच्यामार्फत सुरू असतो.गॅस, तेल आणि गहू यापैकी दोन वस्तू मदत स्वरूपात मिळाल्यास १० रुपयांत दर्जेदार जेवण देणे शक्य आहे. प्रत्येक वाराची भाजी निश्चित असल्याने त्या प्रमाणात धान्य भरले जाते. त्यात मूग, मटकी, सोयाबिन, शेवभाजी, छोले यांचा प्रामुख्याने समावेश असतो. काही व्यक्ती या उपक्रमास स्वत:हून मदत करतात.प्रत्यक्षात एकवेळचे जेवण देताना प्रत्येक ताट हे २० रुपयांच्या घरात जाते. परंतु, ते १० रुपयांत देत असताना त्यासाठी काही दानशूर व्यक्ती, संस्थांची मदत होते. कोणाचा वाढदिवस असेल, तर ती व्यक्ती जेवणाचा सर्व खर्च करते. तसेच काही व्यक्तींची आर्थिक मदत होते, तर काही वस्तूस्वरूपात धान्य देत असल्याने त्याचीदेखील मदत होते.

टॅग्स :thaneठाणेambernath-acअंबरनाथShiv Senaशिवसेना