शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

किल्ले माहुलीच्या कुशीतील गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:23 IST

शहापूर शहारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि मुंबई - नाशिक महामार्गालगतच्याच इतिहासकालीन किल्ले माहुलीच्या कुशीत असलेल्या पाच महसुली गावे आणि १८ आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे.

- वसंत पानसरेकिन्हवली : शहापूर शहारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि मुंबई - नाशिक महामार्गालगतच्याच इतिहासकालीन किल्ले माहुलीच्या कुशीत असलेल्या पाच महसुली गावे आणि १८ आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावू लागली आहे. विशेष म्हणजे महसुली गावांना ज्या विहिरींवरून पाणी योजना सुरू होती त्या विहिरींचे पाणी देखील आटल्याने ग्रुपग्रामपंचायत आवाळे येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते आहे.ग्रुपग्रामपंचायत आवाळे मध्ये माहुली, चांदरोटी, आवाळे, मामणोली, कराडे या पाच महसुली गावांचा समावेश आहे. तसेच जुनवणी, शाळेचा पाडा, ग्रामपंचायत पाडा, आंबेडोह पाडा, वाडूपाडा, टोकरेपाडा, जांभूळपाडा, बेरिसंगी पाडा, सुतार पाडा, खरपडे पाडा, पत्र्याचा पाडा, बोरीचा पाडा आणि इतर असे १८ आदिवासी पाडे आहेत. या ग्रामपंचायतीमधील गाव - पाड्यांची लोकसंख्या तब्बल चार हजार आहे. विशेष म्हणजे या ग्रामस्थांना अजूनही थेट नदीवरील नळपाणी योजनेचा लाभ मिळालेला नाही. गावात असलेल्या विहिरींवरून नळाद्वारे पाणी, तर काही आदिवासी वाड्यांना बोअरवेलद्वारे पाणी सुरू असते. यंदा मात्र एप्रिलअखेरपासूनच पाणी टंचाईचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागतो आहे.किल्ले माहुलीवर बारमाही पाणीमाहुली किल्ल्यावरील भांडार गडावर आजही पाण्याचे तलाव, दगडी मोठ्या पाण्याच्या टाक्या अस्तित्वात आहेत. गडावर पर्यटनासाठी सोयी जरी कमी असल्या तरी पर्यटकांना गडावर गेल्यावर या तलावातील, दगडी पाण्याच्या टाक्यांमधील थंड पाणी बारमाही उपलब्ध असते. पाऊसकाळात याच गडावरून वाहणाऱ्या भारंगी नदीचे पाणी भातसा नदीला जावून मिळते. तेच पाणी अडवण्यासाठी माहुली किल्ल्याच्या खालील बाजूस शासनाने वेगवेगळे बंधारे बांधले आणि परिसरातील माहुली आणि चांदरोटी गावाजवळील जुन्या तलावांचा गाळ काढून ते स्वच्छ केले तर आसपासच्या आदिवासी पाड्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती माहुली निसर्ग सेवा न्यासच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.आमच्या ग्रामपंचायतीमार्फत काही खाजगी कंपनी मालकांची मदत घेऊन परिसरात जे शिवकालीन तलाव आहेत, त्यांचे गाळ काढण्याचे काम आम्ही लवकरच हाती घेणार असून सद्यस्थितीत पंचायत समिती प्रशासनाकडे वाढीव टँकरची मागणी केली आहे. - प्रदीप आगीवले, उपसरपंच, ग्रुपग्रामपंचायत आवाळेकिल्ले माहुलीची उंची जास्त असल्याने गडावरील पाणी खाली आणण्यापेक्षा परिसरातील शिवकालीन तलाव तसेच भारंगी नदीवर शहापूरपर्यंत सिमेंट बंधारे बांधले गेले तर माहुली परिसरासोबतच शहापूरचा पाणी प्रश्नही निकालात निघू शकतो. यासाठी आमची संस्था नेहमीच प्रशासनास सहकार्य करेल. - अ‍ॅड. अमेय आठवले, माहुली निसर्ग सेवा न्यास संस्था, शहापूरमाहुली जवळील भाग उंचावर आहे आणि पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्याचा स्रोत उपलब्ध होत नाही. सध्या तेथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने दिवसाड पाणी पुरवठा केला जात आहे. पुढे ठोस उपाययोजनांचे प्रस्ताव पाठवण्यात येतील.- विजया पांढरे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती, शहापूर

टॅग्स :thaneठाणे