शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

रेतीउपशामुळे खाडीत गाळाचे साम्राज्य; वेगही मंदावलेला

By admin | Updated: April 24, 2017 02:15 IST

ठाणेअंतर्गत कोलशेत, साकेत आणि दिवा या मार्गांवर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. तसेच इतर शहरांना जोडण्यासाठी ठाणे-कल्याण

ठाणेअंतर्गत कोलशेत, साकेत आणि दिवा या मार्गांवर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. तसेच इतर शहरांना जोडण्यासाठी ठाणे-कल्याण, ठाणे-भिवंडी आणि ठाणे-बोरिवली या मार्गांवर जलवाहतूक सेवा प्रस्तावित करण्यात येणार आहे. या जलवाहतूक प्रकल्पाचे मुख्य वाहतूक केंद्र कोलशेत येथे बनवण्यात येणार असून या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष, पार्किंग व्यवस्था, तिकीट काउंटरसह सर्व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव या सर्व महापालिकांच्या वतीने बनवण्यात येणार असून तो केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दरम्यान, त्यानुसार गायमुख येथे जेटी बांधण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच त्या परिसराचे सौंदर्यीकरण करणे तसेच ते स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या खाडीला मिळणाऱ्या नाल्याची अरुंद मुखे वाढवण्याबाबतही पालिकेने पावले उचलली आहेत. सध्या मुंबई आणि नवी मुंबईला या जलवाहतुकीतून वगळण्यात आले असले, तरी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांना ही जलवाहतूक जोडली जाणार आहे. मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तिन्ही स्तरांवर ही वाहतूक सुरू होणार असल्याने रेल्वे आणि रस्त्यांवरील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण मात्र कमी होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. एकूणच ठाणे महापालिकेची ही सुंदर संकल्पना असली, तरी यामध्ये आजही काही महत्त्वाच्या अडचणी आहेत. त्या दूर करणे पालिकेला क्रमप्राप्त आहे. कोलशेत ते थेट घोडबंदर-गायमुखपर्यंत खाडी परिसर बऱ्यापैकी चांगला असला तरीही येथे बेसुमार रेतीउपसा सुरू असून याकडे आजही दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंब्य्राच्या पुढील भागात रेतीउपसा करण्यावर पायबंद घातला जात असताना घोडबंदरच्या भागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहणीत दिसून आले. दिवसाढवळ्या येथे रेतीउपसा सुरू असतो. जास्तीचा रेतीउपसा झाल्याने खाडीत गाळ साचला असून हा गाळ काढण्याचे मोठे आव्हान पालिकेपुढे किंबहुना कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आदी महापालिकांपुढे असणार आहे. मुंब्य्रापासून पुढे जाणाऱ्या खाडीत, तर बेसुमार रेतीउपसा झाल्याने खाडीचा मार्गच बदलला आहे. त्यामुळे खाडीचे पात्र रुंद झाले असून मागील काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची बोट खाडीत अडकली. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यात खाडीचे पात्र रुंद झाल्याने आणि खाडीतील गाळ वाढल्याने खाडीचा वेग मंदावला असल्याचा दावा पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. किंबहुना, पाहणीतही अशीच बाब निदर्शनास आली आहे. मागील कित्येक वर्षांपासून खारफुटीच्या कत्तलीमुळे खाडीची जैवविविधता धोक्यात आली आहे. तसेच खाडीत मागील कित्येक वर्षांपासून सोडल्या जात असलेल्या दूषित पाण्यामुळेही जैवविविधता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पालिकेने जलवाहतूक सुरू करताना किंवा इतर महापालिकांनीदेखील या सर्व बाबींचा विचार करून खाडीचे आरोग्य सुधारणे गरजेचे असल्याचे मत खाडीच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. खाडीचा मंदावलेला वेग वाढवला तरच जलवाहतूक लाभदायक ठरेल, असेही मत व्यक्त करण्यात येत आहे.