शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी मिळणार असल्याच्या अफवेने कामगारांची दिशाभूल; बनावट व्हॉइस मेसेज तयार करणा-याविरुद्ध कारवाईची युनियनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 05:15 IST

एनआरसी कंपनीचे दोन हजारांहून अधिक कामगार त्यांच्या थकीत बाकी देण्याच्या प्रतीक्षेत असताना कामगारांची देणी देण्याबाबत मालकासोबत बैठक होऊन डिसेंबर-जानेवारी महिन्यांत कामगारांची देणी दिली जातील.

कल्याण : एनआरसी कंपनीचे दोन हजारांहून अधिक कामगार त्यांच्या थकीत बाकी देण्याच्या प्रतीक्षेत असताना कामगारांची देणी देण्याबाबत मालकासोबत बैठक होऊन डिसेंबर-जानेवारी महिन्यांत कामगारांची देणी दिली जातील, असा दिशाभूल करणारा व्हॉइस मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असल्याने कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांशी खेळण्याचा क्रूर प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.व्यवस्थापनाने कंपनीला २००९ साली टाळे ठोकले. कंपनीच्या २ हजार २२५ कामगारांना कंपनीकडून ६५० कोटींचे येणे थकीत आहे. या थकीत येण्यासाठी आॅल इंडिया इंडस्ट्रीयल जनरल्स वर्क युनियनने कंपनी दिवाळीखोरीत गेली, असे जाहीर करा, असा ठराव अलीकडेच केला. याविषयी न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही युनियनने दिला आहे. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने अलीकडेच एक मेळावाही घेण्यात आला. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने २४ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध केले. या वृत्तापश्चात एका अनोळखी व्यक्तीने दिशाभूल करणारा व्हॉइस मेसेज तयार करून तो व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित केला आहे. ही धादांत खोटी माहिती देणारी व्यक्ती कोण आहे, हे कोणाला माहीत नाही. या व्यक्तीचा नंबर ‘ट्रू कॉलर आयडी’वर टाकला असता हा नंबर कुणा सिंग नावाच्या व्यक्तीचा असल्याचे दाखवले जाते. हा सिंग कोण, कुठला. त्याचा एनआरसी कंपनीशी संबंध काय, असे प्रश्न आॅल इंडिया इंडस्ट्रीयल जनरल्स वर्क युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. उदय चौधरी यांनी उपस्थित केले आहेत. मेळाव्यापश्चात कामगारांचा मिळणारा प्रतिसाद आणि आमच्या संघटनेचा सुरू असलेला न्यायलयीन लढा याचे श्रेय हिसकावून घेण्याकरिता पोटदुखी सुरू झालेल्या काही अल्पसंतुष्ट कामगारांचे प्रतिनिधी व प्रतिस्पर्धी कामगार संघटनेच्या गोटातून हा चावटपणा केला गेला आहे, असे चौधरी म्हणाले. या दिशाभूल करणाºया व्हॉइस मेसेजमध्ये कामगारांना तीन हजार कोटींची देणी मिळणार असून त्याबाबतची बैठक गोयंका व जैन यांच्यासोबत झाली आहे. या बैठकीचे इनकॅमेरा चित्रीकरण करण्यात आलेले असून त्याची फीत लवकर यू-ट्यूबवर कामगारांच्या माहितीसाठी टाकली जाणार आहे, असे त्या दिशाभूल करणाºया अनोळखी व्यक्तीने म्हटले आहे. हा मेसेज कामगारांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरत आहे.- हा मेसेज सर्वस्वी खोटा आहे. त्यामुळे ज्या मोबाइल नंबरहून हा मेसेज आला आहे. त्याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आहोत. या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कामगारांची दिशाभूल केल्याप्रकरणी सायबर अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे