शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दुरूस्तीच्या कामामुळे कंत्राटी कर्मचा-यांची आबाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 17:56 IST

कल्याण: देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. नाटयगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरूवात न झाल्याने एकिकडे आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे याठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या हाताला गेले वर्षभर काम नसल्याने त्यांचीही पुरती आबाळ झाली आहे.

ठळक मुद्देअत्रे रंगमंदिराच्या डागडुजीचा फटका

कल्याण: देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. नाटयगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरूवात न झाल्याने एकिकडे आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे याठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या हाताला गेले वर्षभर काम नसल्याने त्यांचीही पुरती आबाळ झाली आहे.आचार्य अत्रे रंगमंदिर नाटयगृहाची स्थिती आलबेल नसल्याने तसेच डागडुजी करण्याच्या अनुषंगाने या रंगमंदिराचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतू आजवर कामाला सुरूवात झालेली नाही. दुरूस्तीच्या कामांची निविदा प्रक्रिया पार पडून देखील आतापर्यंत कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. त्यात कार्यादेश मिळाल्याशिवाय कामाला प्रारंभ नाही अशी भुमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. मंजूर केलेल्या निविदेला स्थायी समितीची मान्यता घेणे देखील आवश्यक असून ही प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. त्यामुळे दुरू स्तीचे काम सुरू होण्यास अधिक विलंब लागण्याची शक्यता आहे. दरम्यान नाटकाचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी पडद्यावरील कलाकारांइतकीच पडद्यामागील कुशल कर्मचा-यांचीही तितकीच महत्वाची भुमिका असते. परंतू अत्रे रंगमंदिर दुरूस्तीसाठी बंद ठेवले गेल्याने तेव्हापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून येथील सात कर्मचा-यांवर कामाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. हे लाईट, वातानुकुलीत यंत्र, जनरेटर व साऊंड अशी विविध जबाबदारी सांभाळणारे हे सात कर्मचारी अत्रे रंगमीदर ज्यावेळेस उभारण्यात आले तेव्हापासून याठिकाणी काम करीत आहेत. याठिकाणचा कामाचा पसारा पाहता आणखीन कर्मचा-यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतू केडीएमसीने केवळ सातच कर्मचारी तेही कंत्राटी पध्दतीने नेमले आहेत. विशेष बाब म्हणजे गेली अनेकवर्षे काम करणा-या या कर्मचा-यांना कायमस्वरूपी महापालिका सेवेत सामावून घ्या असा ठराव देखील महासभेत मंजूर करण्यात आला आहे. पण त्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याप्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांनी तर या कर्मचा-यांना भेडसावणा-या गैरसोयींचा पाढा तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे कथन करून संबंधित कर्मचा-यांना महापालिका सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली होती. सेवेत कायम करण्यास प्रशासनाला मुहूर्त गावला नसताना आता तर गेले वर्षभर नाटयगृह बंद राहील्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचा-यांची वयही तिशीच्या वर उलटल्याने अन्य कोठे नोकरी मिळू शकत नाही. परिणामी वर्षभर आबाळ सुरू असल्याची व्यथा त्यांनी लोकमतकडे मांडली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली