शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आयुक्त भेट देत नसल्याने जागरूक नागरिकांचा कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 17:38 IST

कल्याण, दि. २५ - कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू हे नागरिकांना भेट देत नसल्याने महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोर्पयत आयुक्त भेट देत नाही. तोर्पयत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.महापालिका हद्दीत नागरिकांना सेवा पुरविल्या जात नाही. नागरिकांकडून कर वसूल केला जातो. सेवा नाही, तर ...

कल्याण, दि. २५ - कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू हे नागरिकांना भेट देत नसल्याने महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोर्पयत आयुक्त भेट देत नाही. तोर्पयत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.महापालिका हद्दीत नागरिकांना सेवा पुरविल्या जात नाही. नागरिकांकडून कर वसूल केला जातो. सेवा नाही, तर कर नाही या स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी यापूर्वीच महापालिका प्रशासनास दिला आहे. सेवा पुरविण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याकरीता एक सिटीझन फोरम एकवटली आहे. त्यासाठी सामाजिक व माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणोकर यांनी पुढाकार घेतला आहे. घाणोकर यांच्यासह माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, उमंग सामाजिक संस्थेचे गफ्फार शेख, जागरुक नागरिक उर्मिला पवार, काबीस सय्यद, शैलेंद्र बेहरे, अस्लम कर्ते, प्रथमेश सावंत, सुलेख डोन, अपंग संस्थेचे शंकर साळवी, अशोक भोईर आदींनी ठिय्या दिला आहे. घाणोकर यांनी सांगितले की, नागरी सेवा सुविधा पुरविण्याविषयी आयुक्तांकडे यापूर्वी अनेक वेळा पत्र व्यवहार केला आहे. त्यांच्याकडे चर्चेसाठी भेटीची वेळ मागितली आहे. नागरी सुविधा पुरविण्यासाठी वेळ मागितली आहे. ही कामे आमची वैयक्तीक नाहीत. तरी देखील आम्हाला वेळ दिली जात नाही. आयुक्त नागरीकांना दर सोमवारी 3 ते 5 या वेळेत भेटतील असा फलक आयुक्त दालनाच्या समोरील पॅसेजमध्ये लावला आहे. त्यावर कामाशिवाय या ठिकाणी कोणी उभे राहू नये असे नमूद केले आहे. त्यामुळे आम्ही सगळ्य़ांनी कामासाठी बसून घेतले आहे. आयुक्तांच्या सचिवांकडे आयुक्तांना भेटण्याचे सांगून देखील आयुक्त भेटीसाठी आलेले नाही. ते मुख्यालयात कामानिमित्त होते. मात्र आम्हाला भेट न देताच ते महापालिकेकून निघून गेले आहेत.याविषयी घाणोकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरीकांना भेटण्यासाठी आयुक्तांना वेळ मिळत नाही. तर नागरीकांच्या समस्या कशा काय सुटणार असा प्रश्न घाणोकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेत आयु्क्त नाहीत. मात्र उपायुक्तांना आम्ही भेटू शकतो. तर उपायुक्तही नसल्याने  आम्ही कोणाला भेटायचे. निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. उपायुक्तांना नाहीत. उपायुक्तांची भेट घेऊन काही एक उपयोग होणार नाही. लोकशाही दिन असतो. त्यात नागरीक तक्रारी मांडू शकतात. मात्र लोकशाही दिन हा प्रत्यक प्रभाग अधिकारी पातळीवर होत असला तरी प्रभाग अधिका:यांनाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नागरीकांच्या समस्यांचे निराकरण कसे होणार हा मूळ प्रश्न आहे. जोर्पयत आयुक्त भेटणार नाहीत. तोर्पयत हे आंदोलन मागे घेतला जाणार नाही. दरम्यान मुख्यालयात पोलिसांना पाचारण करण्यात आले आले. या प्रकरणी अद्याप तोडगा निघालेला नाही.                         

टॅग्स :Governmentसरकार